शेती

कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने ! या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार Heavy rain in Maharashtra

कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने ! या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार


वेगवान मिडीया

नागपूर ता. 24  सप्टेंबर 2024-  Heavy rain in Maharashtra  महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या मार्गवर जाणार अशी बातमी येऊन ठेपली असतांनाच पावसाने मात्र आपला मुक्काम वाढविला आहे. आता हा पाऊस महाराष्ट्राचा घाम काढणार आहे. मुसळधार पाऊस जाता जात धुवन काढणार आहे. The rain will wipe out Maharashtra for so long! Heavy rain will occur in this district

 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार असून अनेक जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे व जोरदार पाऊस पडणार असून वीजांचा कडकडाट होणार आहे.

 

दरम्यान काल नाशिक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटींग केली असून पावसाने सर्वत्र दाणादान उडविली आहे. परतीचा पाऊस जातांना महाराष्ट्राला ठोकून जाणार यात शंकाच नाही.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून (२४ सप्टेंबर) पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहणार आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी (२४ सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाचे एक महत्वाचे अपडेट प्राप्त झाले असून हे अपडेट म्हणजे महाराष्ट्रातील काही जिल्हांमध्ये अतिवृष्टी होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहा कोठे पाऊस

23 सप्टेंबर, IMD कडून महाराष्ट्रात पुढील 4,5 दिवस खाली दिलेल्या प्रमाणे मुसळधार पावसाचा इशारा. 24 आणि 25 रोजी अधिक पावसाचे इशारा देण्यात आला आहे.

 

आज या जिल्ह्यांना आॅरेंज आलर्ट

सातारा, रायगड, रत्नागीरी,कोल्हापूर,सिंधदुर्ग,बीड, नांदेड,परभणी, हिंगोली, या  जिल्ह्यांना आज आॅरेंज अर्लट देण्यात आला आहे.

येलो अलर्ट यामध्ये पालघर, ठाणे, नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, अकोला, बुलढाणा, जालना, यवतमाळ, अकोले, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना आज 24 ला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

. नैऋत्य मान्सूनची माघार सोमवारी (२३ सप्टेंबर) वायव्य राजस्थान आणि कच्छ प्रदेशातून सुरू झाली. विलंबित माघारीचे हे वर्ष सलग १४ वे वर्ष आहे. सामान्यतः, माघार 17 सप्टेंबर रोजी सुरू होते, परंतु यावर्षी ती सात दिवस उशिरा सुरू झाली. गेल्या वर्षी, 25 सप्टेंबर रोजी माघार सुरू झाली होती. यावर्षी, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे माघार घेण्यास आणखी विलंब होऊ शकतो. त्यामुळे यंदा मान्सून माघार घेण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!