महाराष्ट्राची राजधानीतून निघाणार एक दोन नव्हे तर एवढे नवीन मार्ग
महाराष्ट्राची राजधानीतून निघाणार एक दोन नव्हे तर एवढे नवीन मार्ग

वेगवान मिडीया / दिपक पांड्या
मुंबई, ता. 24 सप्टेंबर 2024- संपूर्ण जगाचे मुंबईवेधून घेते. भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबईची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या लोकसंख्येला मार्गक्रमण करण्यासाठी रस्ते कमी पडू लागले आहे.
मुंबई मधून प्रवास करायचा म्हणजे ट्राफिक जाम हा शब्द तर पाठचं असला पाहिजेत. एक नाही दोन चार चार मुंबईच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडण्याचे प्रसंग मुंबईसाठी काही नवीन नाही.
महाराष्ट्र आर्थिक केंद असलेल्या मुंबई प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला कधी न कधी जाण्याचा योग येतो. मात्र वाहतूक कोंडीमुळे मुंबई बरोबर येणारा प्रवाशी पण एवढी वाहतूक कोंडी पाहून त्याला वाटतं पुन्हा मुंबईत यावे की नाही.
अजूबाजूचे उपनगरही बेजार झालेले आहे. ते म्हणतात ना मुंबईमध्ये गेल्यानंतर मुंगी लाही शिरायला वाव नसते, अशी स्थिती मुंबईची झालेली आहे. मुंबईच्या सर्व रस्त्यांवरून वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होते आणि यामुळे या कोंडीला अनेक प्रवासी वैतागतात. ग्रामीण भागातून गेलेल्या व्यक्तीसाठी हा प्रवास तर अत्यंत कंटाळवाणा आहे.
मात्र मुंबईच्या रस्त्यावरील कोंडी आता सुटाणार आहे. कारण मुंबईच अर्धा दिवस हा वाहतूक अडकून पडल्याने जातो. त्यामुळे सर्व नियोजन कोलमडून जातं. या सर्व विचार करुन मुंबईचा मार्ग मोकळा करण्यासाठी आता नवीन उपयोजना अखण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, मुंबईत 90 किमी रस्त्यांचे जाळे विकसित केले जाईल, ज्यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भुयारी मार्गांचा समावेश असेल.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, खोपोली, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार या जवळपासच्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दररोज 2 ते 4 तास प्रवास करावा लागतो. हा भार कमी करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई आणि उपनगरांना जोडणारे सात बाह्य आणि अंतर्गत रिंगरोड बांधण्याची योजना आणली आहे.
हे रिंगरोड पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना शहराच्या कोणत्याही भागात किंवा उपनगरात ५९ मिनिटांत पोहोचता येणार आहे. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम भाग विविध रस्त्यांद्वारे जोडला जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि पाच वर्षांत मुंबईच्या लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून येतील.
मार्ग कसे दिसतील?
पहिला रिंग रोड नरिमन पॉइंटपासून सुरू होईल: नरिमन पॉइंट-कोस्टल रोड-वरळी-शिवडी कनेक्टर-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉइंट.
दुसरा रिंग रोड नरिमन पॉइंटला वांद्रे-वरळी सी लिंक-सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड-वेस्टर्न एक्स्प्रेस-वे-ईस्टर्न एक्स्प्रेस-वे-ऑरेंज गेट टनेल-नरीमन पॉइंटला जोडेल.
तिसरा रिंग रोड नरिमन पॉइंट ते वांद्रे-वरळी सी लिंक-वेस्ट एक्स्प्रेस वे-जेव्हीएलआर-कांजूरमार्ग जंक्शन-पूर्व द्रुतगती मार्ग विस्तार-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.
चौथा रिंग रोड नरिमन पॉइंटला वांद्रे-वरळी सी लिंक-वर्सोवा वांद्रे सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-गोरेगाव मुलुंड लिंक रोड-पूर्व द्रुतगती मार्ग विस्तार-पूर्व द्रुतगती मार्ग-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉइंटला जोडेल.
पाचवा रिंग रोड नरिमन पॉईंट ते वांद्रे-वरळी सी लिंक-वर्सोवा वांद्रे सी लिंक-वर्सोवा दहिसर लिंक रोड-भाईंदर फाउंटन कनेक्टर-गायमुख घोडबंदर बोगदा-ठाणे कोस्टल रोड-आनंद नगर-साकेत फ्लायओव्हर-पूर्व द्रुतगती मार्ग विस्तार-ऑरेंज गेटपर्यंत विस्तारेल. बोगदा-नरीमन पॉइंट.
सहावा रिंग रोड नरिमन पॉईंट ते वर्सोवा वांद्रे सी लिंक-मीरा भाईंदर लिंक रोड-अलिबाग विरार कॉरिडॉर-ठाणे कोस्टल रोड-आनंद नगर साकेत फ्लायओव्हर-पूर्व द्रुतगती मार्ग-पूर्व द्रुतगती मार्ग विस्तार-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.
सातवा रिंग रोड नरिमन पॉईंट ते वर्सोवा-दहिसर भाईंदर लिंक रोड-उत्तन लिंक रोड-वडोदरा मुंबई एक्स्प्रेस हायवे-अलिबाग विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर-अटल सेतू जेएनपीटी-ऑरेंज गेट बोगदा-नरीमन पॉइंटपर्यंत विस्तारेल.
