LIVE नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटींग, पुढील काही तास महत्वाचे LIVE Nashik: Heavy rain
LIVE नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटींग, पुढील काही तास महत्वाचे LIVE Nashik: Heavy rain
वेगवान नाशिक / अरुण थोरे
नाशिक, ता. 24 LIVE Nashik: Heavy rain नाशिक जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावत जोरदार बॅंटींग सुरु केली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या.
नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा लागवडीसाठी शेतक-यांची लगबग सुरु असून शेतक-यांचे सोयाबीन काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे शेतकरी प्रथम स्थान कांदा या पिकाला देतांना दिसत आहे.
मनमाड- मोठ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. काल मनमाड परिसरामध्ये जोरदार पावसाने झोडपले आहे. चांदवड, येवला, निफाड, नाशिक शहर, देवळा, तालुक्यात पावसाने काल चांगलीच हजेरी लावली.
निफाड मधील मरळगोई सह परीसरात दुसर्या दिवशीही परतीच्या पावसाची हजेरी लावली. सकाळ पासून वातावरण दमट असल्याने, दिवसभर घामाघुम झालेल्या जनतेला परतीच्या पावसाने दुसर्या दिवशीही परीसरात जोरदार बॅटींग करूण सुखद गारवा दिला.
परीसरात जोरदार पाऊस सुरू झाला असुन, मागील ४ महीण्याची कमतरता भरून काढण्याचं काम हा परतीचा पाऊस करु शकतो. अशी अपेक्षा बळीराजा कडुन होताना दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी उद्या महत्वाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या जोरदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने तसं अलर्ट दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे व ढगांचा गडगडाट होणार असून हवामान विभागाने पाऊस सुरु असतांना झाडाचा असरा न घेण्याच्या सुचना दिल्या आहे.
प्रतिनिधी अपडेट, अविनाश पारखे,