शेती

महिलांनो, या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik-                                विशेष प्रतिनिधी,२४ सप्टेंबर.- 

मागील काही महिन्यांपासून राज्यभरात चर्चेत असलेल्या व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता (रु.१५००) लाभार्थी महिलांच्या खात्यावर रविवार दि. २९ सप्टेंबर नंतर जमा करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने आतापर्यंत लक्षणीय प्रगती केली आहे. राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटींहून अधिक ऑनलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहेत. यापैकी एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आकडे योजनेच्या लोकप्रियतेचे आणि गरजेचे निदर्शक आहेत.

काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी २९ सप्टेंबरला रायगडमधील ता.माणगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यपातळीवरील कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!