कोसळलेल्या कांद्याची जोरदार उसळी, आजचा भाव पहाचं एकदा Status of Onion rates
कोसळलेल्या कांद्याची जोरदार उसळी, आजचा भाव पहाचं एकदा

वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिका,ता. 23 सप्टेंबर 2024- दोन तीन दिवसापूर्वी कांद्याचे भाव अचानक कमी झाल्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. काबड कष्ट करुन शेतकरी आपला मात्र पिकवितो मात्र बाजार नेतांना भाव जर कमी झाले तर त्याची मोठी निराशा होते. आज मात्र कांद्याचे उच्चांक गाठला आज नाशिक सह राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याने चांगलीच उसळी घेतली.
सध्या उन्हाळ कांद्याचे बाजारभाव टिकून आहे. वाढते भाव शेतकर्यांना चांगले पैसे मिळून देत आहे .दुसरी कडे पोळ,रांगडा या लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे .तर उन्हाळ कांदा भाव बघता रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीकडे शेतकरी वळला आहे .
दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील कांदा बाजारातील आवक आणि दर खालील प्रमाणे आहेत:
नाशिक जिल्हा: उन्हाळ कांद्याची एका दिवसाची आवक आवक 64,365 क्विंटलपर्यंत झाली असून, बाजारात दर 3,250 ते 4,550 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. सिन्नर, लासलगाव आणि कळवण बाजारात 4,100 ते 4,500 रुपये दर मिळतो आहे.
अहमदनगर जिल्हा: उन्हाळ कांद्याची आवक 11,793 क्विंटल असून दर 3,250 ते 4,100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे.
धुळे जिल्हा: धुळ्यात उन्हाळ कांद्याची आवक 4,306 क्विंटल असून, दर 3,225 ते 4,125 रुपये आहे.
जळगाव जिल्हा: जळगावमध्ये उन्हाळ कांद्याचे दर 2,900 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल आहे.
नंदुरबार जिल्हा: नंदुरबारमध्ये सध्याचा कांदा दर हा इतर जिल्ह्यांप्रमाणेच आहे, अंदाजे 3,000 ते 4,500 रुपये.
कांद्याची आवक आणि दर विविध बाजारांमध्ये बदलत असतात. सर्वसाधारणपणे उन्हाळ कांद्याचे दर 3000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत.
आज वाढले कांद्याचे भाव
पिंपळगाव बाजार समितीमध्ये 5252 रुपये कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला सरासरी या बाजार समितीमध्ये 4700 रुपयांपर्य़ंत भाव राहिला.
कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार.ढोलबारे मध्ये 5300 रुपये जास्तीत जास्त भाव राहिला आणि सरासरी 4700 रुपये भाव राहिला
श्रीरामपूर बाजार समिती मध्ये सरासरी 3850 आणि जास्तीत 4600 रुपये कांद्याला भाव मिळाला.
गोदावरी कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती सांगवी फाटा (सांगवी भुसार), कोपरगांव, अहिल्यानगर, महाराष्ट्र-423602.
दि.23/09/2024 सोमवार
🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
—————————————-
कांदा
1 नंबर -4660-4801
2 नंबर -4510-4650
3 नंबर -4220-4500
गोल्टी/गोलटा -3800-4200
चोपडा/खाद -1100-2875
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
दिनांक २३/०९/२०२४ सोमवार.
एकूण कांदा लिलाव २०० नग
लाल कांदा – ०० नग
ऊन्हाळ कांदा – २०० नग
कांदा आवक अंदाजे ३५०० क्विंटल
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
कांदा खाद/चो. –
ऊन्हाळ कांदा – ३१०० – ४८५६ – ४६००
