नाशिक जिल्ह्यात शेकडो एकारावर होणार धरणःकोणाची जाणार जमीन
नाशिक जिल्ह्यात शेकडो एकारावर होणार धरणःकोणाची जाणार जमीन

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 22 सप्टेंबर 2024 – नाशिक जिल्ह्यात असंख्य पाणी डोंगर द-या खो-यामधून समुद्राला वाहून जातं. नाशिक जिल्ह्याचे अंसख्य पाणी हे गुजरातला वाहून जातं.
त्याचा न महाराष्ट्राला फायदा होतं ना नाशिक जिल्ह्याला, मात्र जेही पाणी आहे ते जर आडविले तर त्यांचा नाशिक जिल्ह्यातील लोकांना किंवा सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात आता अनेक एकर जमीन पाणीखाली जाणार आहे. कारण या ठिकाणी सर्वात मोठा तलावाची निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.
ही परवानगी मिळण्यासाठी अनेक वर्ष लागली. मात्र नाशिक जिल्ह्याचे व येवला तालुक्याचे कैवारी छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे एवढा मोठा प्रकल्प आता तडीस नेला जाणार आहे.
या भल्या मोठ्या प्रकल्पासाठी शेकडो एकरची जमीन लागणार आहे. ही जमीन मिळविणे फार कठीण काम असल्यामुळे यासाठी मोठा संघर्ष सुरु आहे. आता या प्रकल्पासाठी शेकडो एकर जमीन जाणार असल्यामुळे आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल की हा प्रकल्प किती मोठा असू शकतो.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्पासाठी ६४५.६४ लक्ष इतक्या रकमेच्या मेळाचा बंधारा या साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तसेच या कामाचा कार्यारंभ आदेश देखील मिळालेला होता.
मात्र हा प्रकल्प राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार असल्याने राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरू होऊ शकले नव्हते. या परवानग्या घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी प्रस्ताव जातो तिथे मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता.
उत्तर-पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने या ठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
या धरण योजनेची वर्क ऑर्डर नोव्हेंबर २०१७ मधील असल्याने योजनेची सुधारित किंमत १५,७४,००,००० झाली आहे. राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळा स्थायी समिती, केंद्र शासनाचा वने आणि पर्यावरण विभाग आदी विभागासह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे.
बंधाऱ्यामुळे परिसरातील १७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा जमीन वनराखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे. आता टप्पा-२ ला परवानगी मिळाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. हा मेळाचा साठवण (धरण)बंधारा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार आहे
येवला तालुक्यातील ममदापूर परिसरात हा वनजमीनीवर साठवण बंधार होणार आहे. वरील साठवण मेळाचे (बंधारा ) धरणासाठी ममदापूर या प्रकल्पाला वनविभागाकडून टप्पा-२ ची अंतिम परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे ममदापुर साठवण तलावाच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
हा मेळाचा साठवण धरण बंधारा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार आहे
