सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायतीचे सत्य आले बाहेर Sinnar news
सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायतीचे सत्य आले बाहेर

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. २१ सप्टेंबर – प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ना हारकत दाखल दिला नसल्याचे अधिकारी भड यांनी लेखी पत्र देऊन स्पष्ट केल्याने तब्बल सोळा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल स्थगित करण्यात आ,ले असल्याचे उपोषणकर्ते श्री.उत्तम मोकळं यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे सर्व घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना मुळेच मला शक्य झाले व मला न्याय मिळाला असल्याची भावना श्री.मोकळ यांनी व्यक्त केली.
सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ ग्रामपंचायतीने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सन 2007 ची एन .ओ. सी. कंपोस्ट प्लांटला ( ना हरकत ) दाखला दिला नसताना खोट्या दस्तऐवज ची नोंद केली.
यासंदर्भात वारंवार तक्रार देऊन लेखी स्वरूपात उत्तर मिळत नसल्याने त्या कार्यकाळात सरपंच पदावर कार्यरत असलेल्या श्री उत्तम मोकळ यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले व दि. ५ सप्टेंब 2024र पासुन तब्बल सोळा दिवस चालणार्या या उपोषणाला यश आले. आणि त्या अनुषंगाने आज 16. व्या दिवशी कोळगाव माळ ग्रामपंचायत यांनी कारखान्याला कंपोस्ट प्लांट चालवण्यासाठी दाखला दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोळगाव माळ ग्रामपंचायत यांनी सण 2007 ची एन.ओ.सी . ( ना हरकत दाखला ) कंपोस्ट प्लांट चालविण्यासाठी दिला नसतानी त्यावेळेस उत्तम मोकळ विद्यमान सरपंच असताना ग्रामपंचायतीने दाखला दिला नसताना खोट्या दस्ताऐवजाचे पुरावे सादर केली. अनेक वेळा प्रदूषण मंडळासमोर लेखी व तोंडी विनंती केली होती. ते मिळण्यासाठी त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून दाखला मिळत नसल्यामुळे श्री मोकळ यांना अमरण उपोषण करावे लागले 16 व्या दिवशी मला संविधानाच्या कायद्याने प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी भड यांनी पत्र देत लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता केली व उपोषणापासून परावर्तन केले.असेही श्री मोकळ यांनी सांगितले आहे.
या वेळी उपस्थित प्रदूषण मंडळाचे कर्मचारी तसेच कार्यसम्राट महिपत वाणी व कामगार चालक भारत सुर्वे व कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदर्गे व बाबा भालेराव विलास रणशेवरे विक्रम गायकवाड अनिल भाई गांगुर्डे चंद्रशेखर पगारे बहाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रतिक्रिया … …
श्री उत्तम मोकळ — सर्व कागदपत्राची जुळवा जुळव करून खरे खोटे दस्तऐवज तयार करून माझी केलेली कारखान्याने बदनामी यासाठी मी जनहित याचिका दाखल करून पुढील माझ्या न्याय हक्कासाठी ही लढाई चालू ठेवणार आहे असे उत्तम मोकळ उपोषण कर्ते यांनी सांगितले. या संदर्भात श्री मोकळ यांनी वावी पो. ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री श्री गणेश शिंदे साहेब यांची भेट घेतली असून या संदर्भात चर्चा केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा भालेराव उपस्थित होते. येत्या दोन तीन दिवसांत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण आतापर्यंत माझी विनाकारण बदनामी झाली आहे…
