महाराष्ट्रात पावसाची आदळआपट अनेक जिल्ह्यात मुसळधार ! Heavy rain in Maharashtra
महाराष्ट्रात पावसाची आदळआपट अनेक जिल्ह्यात मुसळधार ! Heavy rain in Maharashtra

wegwannashik / साहेबराव ठाकरे
पुणे, ता. Heavy rain in Maharashtra मागील वर्षी दुष्काळाची चटके सहन केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पाऊस पाण्याचा अपडेट जाणून घेण्यासाठी उत्साही असतो महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने नसतानाबूत करून टाकलेला आहे अक्षरशः शेतकऱ्यांची पूर्णता वाताहात लावलेली आहे तर अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक भागाला पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे. मान्सून माघारीचा निरोप अर्ध्यावर येऊन पोहचला असला तरी महाराष्ट्रातून परत जाण्या अगोदर चांगला पाहुणचार करुन जाणार आहे. Heavy rains in Maharashtra in many districts!
राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, काही भागात पावसाने आधीच सुरुवात केली आहे. काही दिवसांच्या संततधार पावसानंतर आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरादर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.Heavy rains in Maharashtra in many districts!
झोडपून काढणार
विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने weather forecast व्यक्त केली आहे. अपेक्षित पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.Heavy rains in Maharashtra in many districts!
परभणीत अनेक दिवसांनंतर मुसळधार पाऊस
प्रदीर्घ कोरड्या पावसानंतर परभणीत पावसाने हजेरी लावली आहे. शहर व परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे आकाश ढगाळ झाले आहे. सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम असल्याने, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत टिकून राहिलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
नाशिक जिल्ह्यासाठी अलर्ट
नाशिक जिल्ह्यात आज ढगाची गर्दी होणार आहे अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. दुपारनंतर पाऊस सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाऊस होईल. ढगांची गडगडाट होऊन वीजांचा कडकडाट होणार आहे. Weather update
अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पवासाची हजेरी लागणार आहे.
आज मुंबई आणि उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या काही तासांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. Heavy rains in Maharashtra in many districts!
