कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून होणार लोडिंगला प्रारंभ

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik:- विशेष प्रतिनिधी,२० सप्टेंबर.-
आज दिनांक २० सप्टेंबर रोजी नाशिक रोड स्थानकावर मध्य रेल्वे प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद्र मालखेडे आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक भुसावळ अजय कुमार यांनी लासलगाव, मनमाड आणि अंकाई किल्ल्यातील कांदा व्यापाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीचा मुख्य उद्देश कांद्याच्या लोडिंग प्रक्रियेस प्रारंभ करणे होता. बैठक अत्यंत फलदायी ठरली, ज्या दरम्यान व्यापाऱ्यांनी २०२४ च्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याच्या लोडिंगला प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले.
तसेच प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबे-सुकेणे स्थानकांचे निरीक्षण केले. या निरीक्षणाद्वारे स्थानकांवरील आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
तसेच, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत नाशिक रोड स्थानकावर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, स्टेशन प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
