आता तुमच्या घराला लागणार नंबर प्लेट, तुमच्याकडून पैसे नाही तर रुपये केले जाणार वसूल
वेगवान नाशिक / मुक्ताराम बागुल
नाशिक, ता. 21 सप्टेंबर 2024, शनिवार ग्रामीण भागातील घरांची नंबर प्लेट द्वारे राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याच्या गोंडस नावाखाली नांदगाव पंचायत समितीची गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त कृपेने परप्रांतीय व्यक्तीवर आर्थिक कमाई करून देण्याची कृपा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
एड्स नियंत्रण बाबत संदेश, कोविड 19 बाबत जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, हर घर सौचालय, अशा शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी घरावर घर मालकाची नंबर प्लेट असलेल्या शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यास मदत होईल.यासाठी सदर इसमास ग्रामपंचायत हद्दीतील घर मालकांनी नंबर प्लेट बसून देण्यासाठी ग्रामपंचायतीला आदेशित करण्यात आलेले आहे.
मात्र शासकीय सेवेचा कोणताही उल्लेख अथवा संस्थेचे नाव सदर पावतीवर नसून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वच मामला संशयास्पद दिसून येत आहे. कारण गावात शेकडो सुशिक्षित तरुण बेरोजगार असताना गावातील कामासाठी थेट मध्य प्रदेशामधील कृपाशंकर गुप्ता व कृष्णसिंग यांचेवर एवढी “कृपा” दाखविण्यामागील गुपित समोर येणे गरजेचे आहे.
तसेच सोबत “छायाचित्र” दिसत असलेल्या नंबर प्लेट मुळे कोणते “राष्ट्रहित” जोपासले जाणार आहे. याचा जाहीर खुलासा नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केला पाहिजे. तर ग्रामपंचायतीचे दोन पगारी कर्मचारी सलग आठ दिवस “कृष्णासिंग” यांचे मदतीला देऊन ग्रामपालिका प्रशासनाने व संचालक मंडळाने गावाचा कोणता सर्वे केला हेही जाहीर करावे.
घरावर नंबर प्लेट लावण्याचा आदेश जिल्हा परिषदने दिला आहे असे या विविध पत्रावरुन दिसेत मात्र खरोखर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हे प त्र जर दिले असेल तर त्याला एवढा उशीर का आणि दिले पण असेल तर लोकांकडून ही लूट का, घरावर कागदाची नंबर प्लेट लावून प्रत्येक घराधारकाडून 50 रुपये वसुल केल्यास महाराष्ट्रात करोड रुपये वसुल होतील.
नेमका हा उद्देश काय आहे. आणि नंबर प्लेट काही लाकडी नसून कागदावरील आहे. तीचा खर्च फक्त एक रुपया प्रमाणे आहे. नाशिक जिल्ह्यात एवढे घर तर महाराष्ट्रातमध्ये किती घरे येतात. यावरुन हा पैसा किती जमा होईल याचा अंदाजा तुम्ही लावू शकतात.
काय आहे सरु
2023 मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढलेल्या संदर्भीय पत्राची अंमलबजावणी चक्क दीड वर्षानंतर तातडीने करण्याची सूडबुद्धी नांदगाव, (नाशिक) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांना का? सुचला हेही न उलगणारी कोडे पडले आहे. एकंदरीत “दाल मे कुछ तो काला है” सब गोलमाल है!
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांची स्वाक्षरी असलेले पत्र जावक क्रमांक “पसना/ग्राप/वि अ (प)/182/24 दिनांक 10/06/2024 नुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचेकडील पत्र जावक क्रमांक/आरोग्य/प्रसिती/101/2023 दिनांक 12/05/2023 यांचा संदर्भ घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील घरांची संख्या निश्चित करणे, जनगणना करणे, कर आकारणी करणे, बीपीएल मतदार यादी बनविणे, शिधापत्रिका तयार करणे इत्यादी कामांसाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत हद्दीतील घरांना क्रमांक देणे या नावाखाली कृपाशंकर गुप्ता सांताक्रुज, मुंबई यांना प्रत्येक घरमालकाकडून 50/ रुपये मोबदला देऊन घरांचे घर क्रमांक वर प्लेटवर कुटुंबकल्याण कार्यक्रम,
त्यानुसार नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी ग्रामपंचायत मध्ये कृष्णासिंग “माऊगंज” जिल्हा “रिया” मध्य प्रदेश येथील एक तरुण सध्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतचे दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघर जाऊन एक कागदाची (तिची किंमत जास्तीत जास्त चार ते पाच रुपये असतील) घराला चिकटवीत असून त्यावर मार्कर पेनने घर मालकाचे नाव व घर नंबर टाकून देत आहे. व त्या बदल्यात “होम नंबर रिसीट” या नावाची एक पावती घर मालकांना देत असून त्यावर “स्वच्छ भारत मिशन” असा गोल शिक्का मारलेला आहे.