नाशिक ग्रामीण

अखेर !आमदार कोकाटेंच्या मालकीची दुध डेअरी झुकली जनतेपुढी झुकली

विषारी सांडपाण्यावर तोडगा निघाला ! उपोषण मागे....


  •     वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

 सिन्नर : दिं , २० सप्टेंबर —   तालुक्यातील हारसुले गावातील लोकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या  खराब व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे गावातील लोकांच्या  आरोग्याशी धोका निर्माण होऊ शकतो..  यावर अखेर  तोडगा काढला असून तहसीलदार  मुंदडा साहेब व पोलीस निरीक्षक यांच्या समोर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या  दुध डेअरी फार्म च्या  येणार विषारी सांडपाणी बंद करण्याच लेखी पत्र दिले असल्याने गावकरी व स्वराज्य पक्ष च्या वतीने   सुरू असलेलं उपोषण मागे घेतले असल्याचे शरद शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

 

स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी २रया दिवशी ३वाजता तहसिलदार मुंदडा साहेब यांच्या  हस्ते हरसुले येथे सुरू केलेले उपोषण सोडले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

श्री शिंदे यांनी या बाबतीत सविस्तर माहिती देताना सांगितले की मुंदडा साहेब यांना मागण्यांच निवेदन दिले. दुध डेअरीच व कंपन्यांच सांडपाणी हरसुले येथील बंधारयात राजरोस सोडले जात होते. हरसुले गावच्या गावकरयांचे यामुळे आरोग्य बिघडते. साथीचे आजाराने मुल,महिला,पुरुष, वयोवृद्ध आजारी पडले.कारण सदर बंधारयातच सरकारी निधीतुन विहीर खोदून पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवली गेली आहे. सदर दुषीत पाणी गावाला पाजले जात असल्याने गावाच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहीला. हरसुले गावच्या लोकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या डेअरीकडे तक्रार केली परंतु ते दाद देईना.

 

” ” सदर दुध डेअरी लोकप्रतिनिधी  आमदार माणिकराव कोकाटे यांची असल्याने कुणी पक्ष,पुढारी जाब विचारण्यासाठी हिम्मत करेना.  ” ”

 

—        शरद शिंदे,         —

स्वराज्य  पक्ष , सिन्नर तालुका अध्यक्ष

… अखेर हरसुले गावचे गावकरी यांनी अडल्या नडल्या करिता रस्त्यावर संघर्ष करणारे स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्याकडे धाव घेतली.शरद शिंदे पाटील यांनी ३/९/२०२४तहसील समोर हातोडा आंदोलन करत सदर डेअरीच सांडपाणी बंद करण्याच निवेदन तहसिलदार साहेबांना दिले. आठ दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा हरसुले येथे आमरण उपोषण, दुसऱ्या दिवशी रास्ता रोको, तिसर्या दिवशी डेअरीत ठिय्या आंदोलन, चौथ्या दिवशी डेअरी मालक अर्थात आमदार कोकाटे यांच्या घरातच गावकरी घेऊन ठिय्या आंदोलन करणार असा इशारा आंदोलक शरद शिंदे पाटील यांनी दिला होता.

 

दहा दिवस झाले तरीही सदर डेअरी कडुन कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. अखेर शब्दाचे पक्के जनतेसाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा विचारावर समाजकारण करणारे शरद शिंदे पाटील यांनी स्वराज्य पक्ष कार्यकर्ते व हरसुले गावचे गावकरी बरोबर घेत दि.१८/९/२०२४ पासून  हरसुले येथे आमरण उपोषण सुरू केले.

 

ठरल्याप्रमाणे१८ला आमरण उपोषण ,१९ला रस्ता रोको,२०ला डेअरीत ठिय्या आणि२१ला डेअरी मालक आमदार कोकाटे यांच्या घरातठिय्या आंदोलन करण्याच ठरले.परंतु दुसऱ्या च दिवशी १९/९/२०२४ला डेअरीच डायरेक्टर मंडळ व मेनेजर उपोषण स्थळी हजर झाले. त्यांनी उपोषणास बसलेले स्वराज्य पक्ष सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांची भेट घेत सांडपाणी थांबवतो उपोषण मागे घ्यावे. त्यावर शरद शिंदे पाटील यांनी हरसुले ग्रामस्थ यांच्या बरोबर बैठक घ्या त्यांच्या दुषीत पाणी समस्या बंदोबस्त करा.कारण हरसुले गाव पिण्याचे पाणी व शेती यासाठी या बंधारयाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हरसुले गावच्या जनतेच्या सहमती शिवाय मी उपोषण थांबणार नाही. हा अधिकार हरसुले गावाचा.मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही मी त्यांच लेकरू आहेत.

 

अखेर उपोषण स्थळी हरसुले गावचे ग्रामस्थ व डेअरीच व्यवस्थापन, सर्व डायरेक्टर मंडळ यांची बैठक पार पडली.सदर बैठकीत हरसुले गावच्या ग्रामस्थांनी डेअरीचे डायरेक्टर व व्यवस्थापन यांना प्रशनांचा मारा करत धारेवर धरले.चिडलेल्या ग्रामस्थांनी कोकाटे साहेब आमदार असताना हरसुले गावाच पिण्याच्या पाण्यात सांडपाणी सोडतात. आमदार आहेत की कोण?काही वाटल पाहिजे. बैठकीत गावकरी डेअरी शिष्टमंडळ यात तुफान खडाजंगी झाली.हरसुलेच्या चिडलेल्या ग्रामस्थांनी डेअरी व आमदार यांच्या नावाने टिकेची लाखोली वाहीली.

डायरेक्टर यांना फैलावर घेतले..अखेर उपोषकर्ते शरद शिंदे पाटील यांनी पुढाकार घेत गावकरी यांनी सयंमाने प्रश्न सांगा आणि त्यावल डेअरीचे व्यवस्थापन यांनी करणारया उपाययोजना सांगा.करणारया उपाययोजना डेअरीच व्यवस्थापन व गावकरी यांच्या चर्चेत झाली व उपाययोजना ठरल्या.या उपाय योजना दुपारी२नंतर माननीय तहसिलदार साहेब यांच्या समोर लेखी दयावे असे शरद शिंदे पाटील यांनी अट घातली.

.मग पुन्हा दु.२वाजे नंतर तहसीलदार साहेबासमोर बैठक ठरली.तसेच तोपर्यंत गावकरी व डेअरी व्यवस्थापन यांनी डेअरी व बंधारा जागेची पहाणी केली.दु.२.३०वाजता तहसीलदार मुंदंडासाहेब व पोलीस उपोषण स्थळी येत उपोषणकर्ते शरद शिंदे पाटील व हरसुले ग्रामस्थ यांची भेट घेतली.उपोषण मागे घ्यावे असे तहसीलदार साहेब यांनी आव्हान केले.

…  त्यावर शरद शिंदे पाटील यांनी तहसीलदार मुंदडा साहेब व पोलिसांना विनंती केली आपण अगोदर डेअरी, बंधारा जागेवर जावे.सदर डेअरीच सांडपाणी कस बंधारयात सोडले जाते?आणि तेच दुषीत पाणी आमदार कोकाटे व ग्रामपंचायत हरसुले गावाला पाजते आणि ग्रामस्थांचे आरोग्य कसे बिघडवते ?याची खात्री करावी.तहसिलदार साहेब, पोलीस,गावकरी, व्यवस्थापन डेअरी व बंधारा जागेवर जाऊन पहाणी केली.पहाणी करताना तहसिलदार साहेब, पोलीस, गावकरी सह डेअरी व्यवस्थापन  ” नाका तोंडावर रूमाल ठेऊन  ” पहाणी केली.

… परिस्थिती पाहता हारसुले ग्रामस्थांचे पिण्याचे पाण्याची  समस्या , गांभीर्य , प्रशासनाच्या लक्षात आले.तहसीलदार,पोलीस,गावकरी, डेअरी व्यवस्थापन पहाणी करून पुन्हा उपोषण स्थळी येत शरद शिंदे पाटील यांना भेट देत तिथे पुन्हा बैठक घेतली.परिस्थिती खरी आहेत आणि सांडपाणी बंधारयात येतय त्यामुळे पिण्याच पाणी दुषीत होतय हे गंभीर आहेत.हरसुले गावच्या जनतेच आरोग्य प्रश्न महत्त्वाचे आहेत ताबडतोब डेअरीच पाणी थांबले पाहिजे. तळयात साचलेल्या घाण पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावा अशा सुचना डेअरी व्यवस्थापन यांना दिल्या.डेअरी व्यवस्थापन यांच्याकडून करणारया उपाययोजना लेखी स्वरूपात घेतल्या.

…  तहसीलदार मुंदडा साहेब पि .एस. आय. मेडम यांच्या आव्हानास मान देत . दोन दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील व गावकरी यांनी सरबत घेत तहसिलदार मुंदडा साहेब यांच्या हस्ते उपोषण सोडत आंदोलन चार वाजता मागे घेतले.

 

**    आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दुध डेअरीच्या विषारी पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी व हरसुलेकरांनी हातोडा आंदोलन केले होते. कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू केले अखेर तोडगा निघाला आणि कोकाटेंच्या मालकीची दुध डेअरी अखेर … जनतेपुढे झुकली….  **

सदर उपोणात सहभागी झालेले महिला अध्यक्ष जयश्री गायकवाड, शंकर दादा शिंदे, प्रमिलाताई लोंढे, छगन शिंदे उत्तम अप्पा शिंदे, ज्ञानेश्वर पोपट शिंदे, रतन जाधव,पवन शिंदे, रामभाऊ मुरलीधर शिंदे, प्रकाश रंगनाथ शिंदे, बि.डी.शिंदे, हिरामण दादा शिंदे ,तुळशीराम शिंदे, माऊली मुकुदा शिंदे,समाधान शिंदे, रवी शंकर शिंदे, प्रकाश वाळीबा शिंदे, राम शिंदे,भास्कर बाबा शिंदे, सागर शिंदे, अनिल केरु शिंदे,रामनाथ रामचंद्र केदार, महादू शिंदे,लहानुदादा शिंदे, खंडु शिंदे,विलास शिंदे,सोमनाथ शिंदे,, बाळासाहेब त्रबंक शिंदे,उत्तम केदार,शशिकांत भास्कर शिंदे,अनिल खंडु शिंदे, अशोक विठ्ठल डावरे,केरू पवार, सुधाकर नवले, तानाजी पवार,जोर्वे दादा, तानाजी वामन शिंदे, रामदास चिमाजी केदार,रामकृष्ण शिंदे, प्रभाकर शिंदे, विष्णू पंढरी शिंदे, मधुकाका शिंदे, रामभाऊ बर्डे, अनिल पवार, ज्ञानेश्वर बोडके, तानाजी यशवंत शिंदे, अजय शिंदे, शिवाजी आव्हाड, पोपट आव्हाड,बाळासाहेब गंगाधर शिंदे, अशोकबुवा पवार,रतन शिंदे, हरि पवार,विलास केदार, हरीभाऊ जाधव, अशोक मोरे,रंगनाथ पवार, राजु घोडे, सुरेखा वडस्कर, मोरेताई,काशाबाई शिंदे,विठ्ठल केदार, माधुरी बोंडवे,सोपान काका शिंदे,,शांताबाई शिंदे, लिलाबाई तुपे,ज्ञानबाब शिंदे,राजू मोरे, राधाबाई बहल,वर्षाताई, निशाताई,योगिताताई पाटील, वराडेताई ,मोरे ताई,राजु बर्डे सह ग्रामस्थ सहभागी झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!