निफाड तालुक्यात आढळला २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह

वेगवान नाशिक/अरुण थोरे
देवगाव ता. निफाड येथे राहुल भाऊसाहेब मेमाणे (वय २२) (राहणार देवगाव ता.निफाड) या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी राहुल हा रात्री ११ सुमारास घरातून बेपत्ता झाला होता.म्हणून त्याच्या घरातील लोकांनी त्याचा शोध घेत असताना, दिनांक १८ सप्टेंबर रोजी दगू लुकाजी मेमाणे ( राहणार देवगाव) यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत राहुल याचा मृतदेह आढळून आला. याबाबत देवगाव चे पोलीस पाटील सुनिल बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना कळवताच, लासलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अकस्मित मृत्यूची नोंद करण्यातआली.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.