अशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडणारा रस्ता होणार चार लेनचा
नादचा झाला. हा रस्ता होणार दोन लेन वरुन चार लेनचा ! अनेक जिल्ह्यांचे दळणवळण
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
Nashik नाशिक, ता. शनिवार, 19 सप्टेंबर 2024 – महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांना मोठंमोठी खड्डे पडलेले आहे. रस्ते डागडुजीवर आलेले आहेत. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री म्हणून छगन भुजबळांचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे आता अनेक जिल्ह्यांचे दळवण होणार रस्ता दोन लेण वरुन चार लेणचा होणार आहे. या रस्त्याचे उद्धघाटन नुकतेच ना.छगनभुजबळ यांच्या उपस्थिती पार पडले.
2004 पासून, मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, नाशिक-येवला रस्ता चौपदरी महामार्गावर सुधारित करण्यात आला, ज्यामुळे वाहतूक प्रवाहात लक्षणीय सुधारणा झाली यामुळे नागरिकांचा आणि प्रवाशांचा वेळ वाचला. या रस्त्याचे औरंगाबाद, नागपूर,अहमनगर, तसेच नाशिक मार्गे मुंबई जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला.
अलिकडच्या वर्षांत, असंख्य खड्ड्यांमुळे हा रस्ता खराब झाला आहे, ज्यामुळे वारंवार अपघात आणि वाहतूकीसाठी आव्हाने निर्माण होत आहेत. मंत्री भुजबळ यांनी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि अखेर आशियाई विकास बँकेच्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात 560 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येवला नाशिक दरम्यान पिंपळस पर्यंतचा रस्ता आता चकाचक होणार असून कंबरदुखी पासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
पिंपळस ते येवला काँक्रीट रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावरील अपघातांचे प्रमाणही कमी होण्याबरोबरच जनतेचा वेळ आणि खर्चात मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असलेल्या लासलगाव-विंचूर रस्त्यावरील अडथळे कमी होतील आणि लासलगाव, सिन्नर आणि शिर्डी दरम्यानचा रस्ता 5.5 मीटरवरून 7 मीटरपर्यंत रुंद करून वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा होईल.
नुकताच मंत्री छगन भुजबळांनी 134 कोटी रुपयांच्या चांदवड-हद्द म्हणजे वाळकेवाडी -लासलगाव ते विंचूर मार्गा चौपदरी करण्यात येणार आहे. सध्या हा रस्ता दोन लेन वरुन वाहतो. रस्ता रामा क्र. ७ किमी १८९/४०० ते १९९/००० आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे १३४ कोटी या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.