मोठ्या बातम्या

बच्चू कडू उमराणे येथे अंस काही बोलून गेले का विचारु नका!


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : भाजप असो वा काँग्रेस ज्यांनी ज्यांनी कांद्यामुळे आमच्या डोळ्यात पाणी आणलं आम्ही त्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही आमदार, खासदार, बोलत नाही. तेव्हा यांना पक्ष प्रिय असतो. म्हणून आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, काँग्रेस व भाजपने निर्माण केलेली शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था ‘उखाड के फेक देंगे’.  असा घणाघाती प्रहार बच्चू कडू यांनी देवळा तालुक्यातील उमराणा येथे शेतकरी मेळाव्या प्रसंगी केला.

जात, धर्म, प्रांत असे वाद करत जर तुम्ही मतदान करत असणार तर तुमच्या इतके बेईमान कुणीच नसेल, निवणूका या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजे. सर्व जाती धर्मात शेतकरी हा घटक आहे आणि त्या घटकासाठी सतत गणेश निंबाळकर लढत असेल तर आता तुमच्या मुद्यावर लढणाऱ्या व्यक्तीला पुढे पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे म्हणत त्यांनी चांदवड-देवळा मतदार संघासाठी गणेश निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब निकम होते. यावेळी हिम्मत महाजन, गणेश काकुळते, गणेश शेवाळे, धर्मा देवरे, हरिसिंग ठोके, बाळू देवरे, नंदन देवरे, आदींनी वसाका, पाणीप्रश्न या विषयक प्रश्न उपस्थित करत आपले मनोगत व्यक्त केले.

निवडणुकीसाठी एका पिकाचे पैसे देणार –
शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नासाठी सतत लढत असणाऱ्या गणेश निंबाळकर यांची आर्थिक परिस्थिती नाजून असल्याने त्यांच्या निवडणूक खर्चासाठी तिसगाव येथील शिवाजी आहेर या शेतकऱ्याने  आपल्या एका पिकाचा पूर्ण पैसा निंबाळकर यांना देण्याचे यावेळी आश्वासन दिले. तसेच चांदवड देवळा विधानसभा मतदार संघातील मेंढपाळ समाजातील बांधवांनी एक एक पैसा गोळा करून एक लाख रुपयांचा निधी रोख स्वरूपात जमा केली. कोलटेक येथील ग्रामस्थांनी एक लाख अकरा हजाराचा निधी गणेश  निंबाळकर यांच्या निवडणुकीसाठी जमा केला होता तो चेक स्वरूपात यावेळी योगेश खंगाल रवींद्र खंगाल यांच्या हस्ते देण्यात आला.
नाफेड वर ताशेरे मारत महायुतीला घरचा आहेर
नाफेडच्या गोडाऊन ला भेट देऊन तेथील कारभार पाहता मंत्री अब्दुल सत्तार यांना  मिटिंग लावायला सांगितले आहे. पियुष गोयल यांच्याकडे आठ ते दहा दिवसांत कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप म्हणत ‘ना खाणार, ना खाऊ देणार’  नाफेडच्या तर चौफेर  भ्रष्टाचार आहे मग नाफेड ने काय खाल्लं असे म्हणत मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी महायुतीला घराचा आहेर दिला.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!