आर्थिक

मोंदीचा वाढदिवसानिमत्ताने महिलांच्या खात्यावर येणार 5000,योजनेचे नाव सुभद्रा योजना, Subhadra Yojna

मोंदीचा वाढदिवसानिमत्ताने महिलांच्या खात्यावर येणार 5000,योजनेचे नाव सुभद्रा योजना, Subhadra Yojna


दिपक पांड्या ( आनलाईन डेक्स )

नवी दिल्ली, ता. 19 सप्टेंबर 2024 महाराष्ट्रात  निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये घोषणांचा पाऊस पडत आहे. याचबरोबर आता देशात सुद्धा घोषणांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. 5000 will come to women’s accounts on the occasion of Mondi’s birthday, the name of the scheme is Subhadra Yojna. महिलांच्या खात्यावर आता 5000 रुपये जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस असल्यामुळे मोदी सरकारने महिलांसाठी एक खास मोठी भेट दिलेली आहे. मोदी सरकार आता महिलांच्या खात्यावर पाच हजार रुपये टाकणार आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहे आणि या योजनेचे नाव आहे सुभद्रा योजना..या योजने मुळे महिलांची बल्ले बल्ले झाली आहे.

महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना आणली आहे. वय वृद्धांसाठी वयोश्री योजना आणलेली आहेत. त्याचबरोबर अनेक योजना महाराष्ट्र मध्ये सध्या सुरू आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर आता जर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचे नाव आहे सुभद्रा योजना, या योजनेतून महिलांच्या खात्यामध्ये 5000 रुपये जमा होणार आहे.

काय आहे ही योजना

या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन दिले आहे.

राज्यातील महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात 10 हजार रुपये देणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणेज 2028-29 पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55,825 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशांच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करु शकतात असा सरकारचा  प्रयत्न आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!