आर्थिक

या कारवर ग्राहकांच्या उड्या, किंमत कमी आणि ड्युअल CNG,नादचं झाला Tata Panch

या कारवर ग्राहकांच्या उड्या, किंमत कमी आणि ड्युअल CNG,नादचं झाला Tata Panch


वेगवान नाशिक / दिपक पांड्या

नवी दिल्ली, ता. 18 सप्टेंबर 2024-  भारतीय बाजारपेठेमध्ये चार चाकी गाड्यांची मोठी रेलचला आहे. प्रत्येकाला चार चाकी घेण्याचे स्वप्न असतं. आपल्या घरापुढे चार चाकी कार उभी राहावी असे प्रत्येकाला वाटत असतं. Tata Panch

त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरासमोर कार उभी दिसते आणि ती तशी क्रेझी पण आहे. आणि ती क्रेज राहणं स्वभाविक आहे. कारण काळ बदलत आहे. आणि बदलत्या काळानुसार आपल्याला बदलावा लागत, आपल्या गरजा वाढल्या त्यानुसार सुविधाही वाढल्या पाहिजेत असं माणसाला वाटतं तुमची गरज कमी पैशा मध्ये पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला या कारची माहिती देणार आहे.

भारताच्या बाजार पेठेमध्ये ग्राहक या कारवर उड्या मारत आहे. भारतीय बाजारपेठेत SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. परवडणारी किंमत, कमी देखभाल आणि चांगले मायलेज यामुळे या कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. अशीच एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सध्या बाजारात धिंगाणा घालत आहे. आणि गेल्या तीन वर्षांपासून SUV विक्री चार्टमध्ये मोठी विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आपल्याला  लक्षात आले असेल की आम्ही टाटा पंच बद्दल बोलत आहोत. अलीकडेच टाटा मोटर्सने या लोकप्रिय कारची अपडेटेड आवृत्ती लाँच केली. त्याची सुरुवातीची किंमत ₹6.12 लाख आहे. टाटा मोटर्सच्या मते, टाटा पंच चालू आर्थिक वर्षातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत, या कारच्या 400,000 पेक्षा जास्त कार विकल्या गेल्या आहे.

टाटा पंचच्या फिचर  म्हणजे ते 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते आणि ते CNG प्रकारात देखील ती उपलब्ध आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. SUV ड्युअल सिलिंडरने सुसज्ज आहे, म्हणजे बूट स्पेसमध्ये दोन छोटे सिलिंडर ठेवलेले आहेत. तथापि, ड्युअल-सिलेंडर सेटअप असूनही, बूट स्पेसमध्ये कोणतीही तडजोड नाही, कारण ते प्रशस्त 366 लिटरचे आहे.

अद्ययावत टाटा पंच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस चार्जर, मागील एसी व्हेंट्स, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासारख्या प्रगत फिचरसह येतो. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये, कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त झाले. SUV मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रीअरव्ह्यू कॅमेरा यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.

पेट्रोल प्रकारासाठी 20 किमी/ली आणि CNG प्रकारासाठी 26 किमी/किलो मायलेजचा दावा कंपनीने केला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!