नाशिक जिल्ह्याच्या या रस्त्याने जाणार असला तर ते दोघे तुम्हाला संपवतील
नाशिक जिल्ह्याच्या या तालुक्यात जाणार असला तर ते दोघे तुम्हाला संपवतील
वेगवान नाशिक / मारुती जगधने
Nashik news नाशिक, ता. 19 आपण जर नाशिक जिल्ह्यातल्या जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जर तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल तर दोघेजण तुम्हाला तुमचं सावज बनवतील. कारण हे सावज म्हणजे प्रत्येक्ष यमराजचं आहे. त्यामुळे आपण जर या बातमीकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
आपण नाशिक जिल्ह्यातून प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर सावध व्हा कारण या रस्त्यांवरती दोन बिबटे फिरत असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि हे बिबटे दुचाकीस्वार, सायकल स्वार व पायी चालणा-या लोकांवर हल्ले करतात अशी चर्चा सुरु आहे.
जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यात श्रीरांमनगर व फुलेनगर शिवारात दोन बिबट्याच्या बथड्यांच्या जोडीला दिवसा रस्त्याच्या कडेला लपून लोकांवर हल्ला करतात व अजूबाजूला वावरताना आनेकांनी बघितले. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या आठ दिवसात तब्बल ४ वेळा बिबट्या नागरिकांच्या नजरेत आले .नागरीकाना न घाबरता बिबटे दमदार पाऊल टाकतात व हाळूच मागे वळून बघतात. आणि हल्ला करतात.
दि ९ ते १६ सप्टेंबर या आठ दिवसात सकाळी फिरायला जाताना चार वेळा बिबट्याची जोडी नागरिकांच्या नजरेत आली. मागील महिण्यात देखील बिबट्याची जोडी फुलेनगर वासीयांच्या पाहण्यात आले होती.
पण वन विभागाने या बांबींकडे कानाडोळा केला आता तर दि १६ रोजी नांदगांव मनमाड रोडवर सकाळी ८ वा सोनार फार्महाउस ते माऊली खानावळ दरम्यान बिबट्याची जोडी रस्ता ओलांडून जाताना वाल्मीक राऊत व विलास राऊत यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अधिकचं सावध झाले.
बिबटे हे सध्या श्रीरामनगर हाद्दीत मुक्कमी आहे .याचि काळजी नागरीकानी घ्यावी या परीसारात मोठ्या प्रमाणात झाडी झुडले व नाले डोंगर भाग असल्याने बिबट्याना लपण्यास जागा आहे. नागरिकांच्या नजरेत आलेले बिबटे हे बछडे आहेत त्यांची उंची दोन फुट आणी लांबी आडीचे ते तिन फुट आहे ते दोघे सोबतच वावारताना नागरीकाना दिसले. त्यामुळे राञी व सकाळी फिरायला जाणार्या नागरीकानी भितीमुळे फिरायला जाने बंद केले. शेळीपालन करणार्या एका महिलेला पण बिबट्याचे दर्शन झाले . हे बिबटे माणसांना घाबरत नाही तर ती चालू बाईकवर झेप घेण्यास मागे पुढे पाहत नाही. चांदवड तालुक्यातील एका दुचाकीवर या बिबटे धावून आले असे गांगुर्डे यांनी वेगवान नाशिकच्यया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
या आठ दिवसात तिन ,चार वेळा बिबट्याच्या जोडीचे नागरीकाना दर्शन झाले आहे .त्यामुळे दिवसा राञीचे बाहेर निघताना नागरीकानी सावधनता बाळगावी तसेच वनविभागाने या संदर्भात तपास करून योग्य ते उपाय करुन पिंजरा लावण्याची गरज आहे सध्या गुरुकुल काॅलेज,माऊली खानावळ,सोनार फाँर्महाऊस भारती सदन, मातोश्री मगल कार्यालय, गायकवाड वस्ती, राऊत वस्ती खोलरस्ता या भागात बिबट्याचा वावर असल्यल्याचे सांगतात.
परिसरात आजुन मका बाजरी पिके उभे आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लपण असल्याने बिबट्याचे वास्तव्य असल्याने सावधनता बाळगावी. श्रीरामनगर,फुलेनगर हार्दीतील नांदगांव मनमाड रस्ता ओलांडताना बिबट्याचा राञी किंवा दिवसा वाहनाच्या अपघाताची शक्यात नाकारता येत नाही.
यासाठी वनविभागाने तत्पर उपाय करावे. बिबट्याचा वावर जंगल आणि ग्रामीण भागात अनेकदा दिसून येतो. वनविभाग अशा परिस्थितीत काही उपाययोजना करत असतो, ज्यामुळे मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष कमी होईल. या उपायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
1. )सावधगिरी आणि जनजागृती: स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे, ज्यामध्ये त्यांना बिबट्याच्या सवयी आणि त्याच्याशी कसे वागावे याबद्दल माहिती दिली जाते.
2. )रात्री घराबाहेर न जाण्याचे सूचना: बिबटे मुख्यतः रात्री सक्रिय असतात, त्यामुळे वनविभाग रात्री घराबाहेर न जाण्याचा सल्ला देतो.
3.) कॅमेर्यांचे जाळे लावणे: बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगल आणि त्याच्या आसपासच्या भागात कॅमेरे लावले जातात.
4.) बिबट्याच्या आहारासाठी खाद्य पुरवठा: वनविभाग काही ठिकाणी बिबट्यांसाठी खाद्य ठेवतात, जेणेकरून ते मानवी वस्त्यांमध्ये शिकार करण्यासाठी येणार नाहीत.
5.) पिंजरे बसवणे: ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे, तिथे पिंजरे बसवले जातात, जेणेकरून बिबट्याला पकडून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवता येईल.
6). शेती आणि पशुधनाचे संरक्षण: लोकांना त्यांची पाळीव जनावरे रात्रीच्या वेळी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी सूचना दिल्या जातात.
7.) वनक्षेत्रातील सीमारेषेचे नियोजन: वन विभाग मानव वस्ती आणि वन्य प्राण्यांच्या वावरातील अंतर राखण्यासाठी सीमारेषांचा आढावा घेऊन आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात
हे सर्व उपाय वन्य प्राण्यांचा सन्मान राखून त्यांचे संरक्षण करत मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे ठरतात.