शेती

यंदा लाल कांदा राज्यातील शेतकर्यांना करोड पती करणार की कंगाल पहा

लाल कांदा राज्यातील शेतकर्यांना करोड पती करणार की कंगाल पहा Red onion will make the farmers of the state rich or poor


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नाशिक, ता. 16 सप्टेंबर 2024 -Status of Onion  महाराष्ट्र राज्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. विशेषतः नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, सोलापूर आणि धुळे हे जिल्हे लाल कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र देशातील एक प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून, इथे सर्वात जास्त लाल कांद्याची लागवड केली जाते.

 

सन 2023 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादन क्षेत्र सुमारे 5-6 लाख हेक्टरच्या आसपास आहे, ज्यामध्ये लाल कांद्याचा मोठा वाटा आहे. लाल कांद्याची लागवड मुख्यतः रब्बी हंगामात (नोव्हेंबर-एप्रिल) होते, परंतु काही भागांत खरीप हंगामातही (जून-सप्टेंबर) कांदा घेतला जातो.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

पोळ व रांगडा (लाल) कांद्याला या खरीप व रब्बी हंगामात दर्जेदार निर्यात होणारा लाल कांदा सरासरी १५००₹ २०००₹ ते २६००₹ असे क्विंटलचे दर मिळतील असा अंदाज जानकार वर्तवितात. सुरूवातीला बाजारात येणारा पोळ किंवा रांगडा कांद्याला चांगले भाव मिळतील यातुन शेतकरी आपल्या आशा अपेक्षा, तसे देणे घेणे पूर्ण करुन हाताशी पैसा बाळगून राहिला  या हंगाम शेतकर्याला लाल कांद्याची लाॅटरी लागेल आणि चांगला भाव मिळेल.

 

बाजारा पेठा पण गजबजलेल्या असतील शेतकरी आपल्या कर्जातुन काही प्रमाणात मुक्त होईल कुटुंबातील लग्न कार्य किंवा लाहान मोठ्या वाहनांची खरेदी करु शकेला असा विश्वास व्यक्त होतो. हे वर्षे कांदा उत्पादकांना दिलास देणारे आहे .

 

लाल कांदा मुख्यतः देशांतर्गत वापरासाठी व निर्यातीसाठी महत्वाचा आहे.सध्या उन्हाळा कादा उत्पादकांना सरासरी १०००₹२०००₹ ३०००₹ ते ४३००₹ क्विंटलचे भाव मिळत आहे.पुढील महिण्यात पोळ व रांगडा कांदा बाजारात येण्याची शक्येता आहे. लाल कांदा बाजारात येताच उन्हाळा चे बाजार घसरतील .

 

महाराष्ट्रात “पोळ” आणि “रांगडा” उन्हाळ हे कांद्याचे तिन प्रमुख प्रकार आहेत,

जे त्यांच्या आकार, रंग, आणि साठवणक्षमता यांमध्ये फरक करतात.

 

पोळ कांदा लागवड:पोळ कांदा मुख्यतः खरीप हंगामात (जून-सप्टेंबर) लागवड केला जातो. त्याच्या उत्पादनासाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

 

उत्पन्न:

पोळ कांद्याचे उत्पादन साधारणतः 10-15 टन प्रति हेक्टर होते, पण योग्य काळजी घेतल्यास हे उत्पादन 20 टन प्रति हेक्टरपर्यंत जाऊ शकते. जमीनीच्या प्रतवारिनुसार हे उत्पन्न कमी जास्त होते.

 

भाव:

पोळ कांद्याचे भाव मुख्यतः स्थानिक बाजारात आणि हंगामाच्या स्थितीनुसार बदलतात. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये नवीन कांदा बाजारात आल्यावर भाव थोडे कमी असतात. सामान्यतः प्रति किलो भाव ₹10 ते ₹30 दरम्यान असू शकतो, म्हणजे 1500₹ ते 2600₹ असे क्विंटल

दर मिळतील?

पण बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार यामध्ये फरक पडतो.

रांगडा कांदा लागवड:

 

रांगडा कांदा मुख्यतः रब्बी हंगामात (नोव्हेंबर-एप्रिल) लागवला जातो. याच्या उत्पादनासाठी मध्यम ते जड जमीन आणि योग्य पाणी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. नाशिक आणि जवळच्या परिसरात रांगडा कांद्याची लागवड जास्त प्रमाणात होते.

 

उत्पन्न:

रांगडा कांद्याचे उत्पादन साधारणतः 15-20 टन प्रति हेक्टर असते, पण आधुनिक तंत्रज्ञान व योग्य काळजी घेतल्यास 25 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन होऊ शकते.

 

उन्हाळ कांदा खरीप हंगामात नंतर. रब्बी हंगामात उन्हाळा कांदा लागवड होते उन्हाळ कांदा साडेतीन ते 4 महिण्यत उत्पन्न मिळते. सध्या पोळ कांदा लागवड झालेली आहे ,त्या नंतर रांगडा लागवड  होईल. आगाऊ उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांनी उन्हाळ कांद्याचे रोप लागवड केली आहे. सप्टेंबर आँक्टोबर महिण्यात उन्हाळ कांदा लागवड होतो.

 

भाव:
रांगडा कांदा , उन्हाळा कांदा अधिक काळ टिकाऊ नसतो, त्यामुळे हिवाळा व उन्हाळ्याच्या कालावधीत याचा मोठ्या प्रमाणात काही दिवस साठा केला जातो. त्याचे भाव मुख्यतः ₹15 ,,30, 40 रु प्रति किलो असू शकतात, पण निर्यातीच्या काळात किंवा मागणी जास्त असताना भाव वाढतात.

 

भारतात लाल कांदा आणि उन्हाळ कांदा उत्पादक प्रमुख राज्ये खालीलप्रमाणे आहेत.

लाल कांदा महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे लाल कांदा उत्पादक राज्य आहे. नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे परदेशात मागणी वाढल्यास भाव अधिक मिळतात निर्यात खुली असल्यास भाव पण चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे अधिक कल देत आहे.

 

निर्यात खुली असल्यास भाव पण चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे अधिक कल देत आहे .: उन्हाळ कांद्याचे उत्पादन देखील महाराष्ट्रात होते, विशेषतः नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये.जास्त प्रमाणत होते. हा कांदा अधिक काळ टिकतो त्यामुळे उन्हाळ कांदा चाळीत साठवला जातो आनेक शेतकरी शेतावरील कांदा चाळ भाडे तत्वाने देऊन पैसे मिळवितात. उन्हाळकांदा डिसेंबर नोव्हेंबर नंतर बाजारात विक्रीला येतो. सध्या उन्हाळाकांदा चांगला भाव खात आहे .गत दोन महिण्या पासून उन्हाळकांदा तेजीत आहे .

कर्नाटकात देखील लाल कांदा उत्पादनात अग्रस्थानी आहे. त्याचे प्रमुख उत्पादक जिल्हे बेल्लारी, चित्रदुर्ग, धारवाड आणि गुलबर्गा आहेत. उन्हाळ कांद्याचे उत्पादनही येथे चांगले प्रमाणात होते. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. इंदूर, उज्जैन, मंदसौर आणि देवास हे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत.

उन्हाळ कांद्याचे उत्पादन देखील मध्य प्रदेशात होते, विशेषत: इंदूर आणि उज्जैन भागात.
शेजारील गुजरात हे लाल कांद्याचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. भावनगर, महेसाणा, आणि राजकोट येथे कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.तसेच

उन्हाळ कांद्याचे उत्पादन देखील गुजरातमध्ये होते.यासह देशातील वाळवंट म्हणून नावारूपाला आसलेले
राजस्थानमध्ये कोटा, झालावाड आणि बूंदी जिल्ह्यांत लाल कांद्याचे उत्पादन होते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन देखील या भागांत होते.
उत्तर प्रदेशमध्ये लाल कांद्याचे उत्पादन आग्रा, बाराबंकी आणि फिरोजाबाद जिल्ह्यांत होते. उन्हाळ कांदा देखील उत्तर प्रदेशात काही प्रमाणात लागवला जातो.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: या राज्यांमध्ये लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, विशेषतः कुर्नूल, महबूबनगर, आणि अनंतपूर जिल्ह्यांत. यासह बिहाराज्यात देखील लाल कांद्याचे उत्पादन होत असून नालंदा आणि पटना भागांत हे प्रमुख आहे.
या राज्यांमधील लाल कांदा आणि उन्हाळ कांदा भारताच्या एकूण कांदा उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

कांद्याचे भाव:

कांद्याचे बाजार भाव वर्षभरात मोठ्या प्रमाणात बदलतात. यावर पावसाचे प्रमाण, लागवडीचे क्षेत्र, हंगामाची स्थिती, बेमोसमी पाऊस, गारपिट, निर्यातीची मागणी आणि सरकारच्या धोरणांचा प्रभाव पडतो.

मुरघास-

सध्या शेतात मका आहे. मात्र कांद्याचे पैसे जास्त होतात म्हणून ज्या शेतक-यांनी आताचं मक्याचा मुरघास करण्यासाठी मका दिली आणि कांदा लागवड केली तर त्यांना चांगला पैसा होण्याची शक्यता आहे. कारण नंतर मका काढून कांदा लागवड करणारे सगळेच शेतकरी असतात त्यामुळे कांद्याचा भाव नंतर मार खाईल. मागील वर्ष दुष्काळ असल्यामुळे कमी कांदा पिकला होता. यंदा मात्र पाऊस बरा आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन वाढणार आहे.

 

प्रतिक्रिया
पोळ व रांगडा कांदा पर राज्यात केरळ, अध्र ,म प्र, आदीसह इतर राज्यात होतो या हंगामात लाल कांदा
२००० ते २६००₹ क्विटंलचे भाव मिळतील
जानेवारी पर्यंत चा कांदा टिकून राहतील शेतकरी सुजलाम होईल असे मत प्रख्यात कांदा व्यापारी रामनिवास कलंञी यांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!