आता महाराष्ट्रात ढगफुटीसारखा पाऊस कोसळणारःपंजाब डख यांच्यासह हवामान विभागाचा अंदाज आला Heavy rain in Maharashtra
आता 11 दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत राहणार आहे. गालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा सक्रिय झाले असून, भारताच्या पूर्वेकडील भागात मान्सूनचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झोडपून काढणार आहे.

वेगवान नाशिक
Heavy rain in Maharashtra मुंबई, ता. 16 सप्टेंबर 2024- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही भागात निरभ्र आकाश आहे. पावसाने काही भागांत थोडा ब्रेक घेतल्याचे दिसते, परंतु सध्या मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र आता एक अपडेट समोर आले आहे. त्यानुसार मान्सुन माघारीचा निरोप घेण्याआगोदर महाराष्ट्रात ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे. It will continue to rain for so long now! That too is like a cloudburst
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा सक्रिय झाले असून, भारताच्या पूर्वेकडील भागात मान्सूनचा जोर वाढला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पाऊस येतो आणि जातो आणि तापमानातही लक्षणीय बदल होतात.
गेल्या २४ तासांत राज्यातील कमाल तापमान ३४.५ अंशांवर पोहोचले असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. रायगड आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागात सूर्यप्रकाश, उष्ण दुपार आणि पावसाळी रात्री अनुभवत आहेत. विदर्भात प्रदीर्घ कालावधीनंतर पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र घाटात पाऊस कमी होऊ शकतो, दाट ढग दिसण्याची शक्यता आहे आणि अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. Weather update
पुढील 15 दिवसांचा हवामान अंदाज: weather forecast
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 19 सप्टेंबरपर्यंत हवामान सामान्य राहील, परंतु त्यानंतर काही बदल अपेक्षित आहेत. वायव्य भारतातील पाऊस 19 सप्टेंबर नंतर हळूहळू कमी होईल. 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान, पूर्व भारत वगळता देशभरातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. आयएमडीचा अंदाज खरा ठरल्यास, या वर्षी आठ वर्षांत पहिल्यांदाच पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर संपेल.
21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्ता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.
