शेती

नाशिकः शेतक-यांची जमीन, घरदार जप्त होणार Debt issue

नाशिकः शेतक-यांचे जमीन, घरदार जप्त होणार The land of farmers and landlords in Nashik district will be confiscated


वेगवान नाशिक / मारुती जगधने 

नांदगाव, ता. 14 सप्टेंबर 2024 – नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज घतलेल्या व थकित झालेल्या शेतकर्याना त्याची मालमत्ता जप्तीच्या अंतीम नोटिसा जिल्हा बँकेने बजावल्या  आहे. या थकीत शेतकर्यांनी घरादारासह मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये एक मोठी भिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा बॅंक ही कारवाई करणार असल्यामुळे आता काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Farmer’s loan

 

नाशिक जिल्ह्यात अनेक शेतक-यांनी जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. शेतक-यांनी नोटीसा बजाविण्या आल्यामुळे शेतकरी वर्गात आता काय व कसे कर्ज भरावे या बाबत संपूर्ण कुटुंब तनावाखाली आले आहे. आता जगावे की मरावे असा प्रश्न या कुटंबाना सतावत आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

नांदगांव तालुका अवर्षनग्रा्त तालुका म्हणुन ओळख आहे सन २००९ मध्ये नांदगांव तालुक्यात महापूर आला होता. त्यात अनेकांच्या जमिनीवर घरे वाहून गेली ,यशव काळात पिंपरखेड येथील एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. या काळात तालुक्यात जवळपास १६ शेतकर्यांनी कर्जबाजारीपणा मुळे व नापिकीने आपले जीवन संपविलेले काही शेतकर्यांनी विष घेऊन तर काहीनी फासी घेतली होती.

 

तालुक्याने प्रचंड प्रमाणात आसमानी व सुलतानी संकटे सोसली आहे. आता त्यातच काहि वर्षापासून असलेला दुष्काळ गापीट,नापीकी, अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला असताना शेतकर्यावर अंतीम जप्तीच्या नोटिसा बजावल्याने हे कुटुंबीय तणाव मध्ये आले आहेत. दि ११/१०/२०२४ रोजी थकबाकीदारांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव होणार आल्याचे जाहीर नोटीस म्ध्ये सांगिले आहे.

 

थकीत शेतकरी मुद्दल व व्याज धरुन असलेली बँकेची थकीत रकमेसह नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.या नोटीसमुळे शेतकरी कुटुंब तान तनावा खाली आले आहे.बँकेने सर्व नियम अटी ची पूर्तता करुन या नोटिसा बजावल्या आहेत . शिवाय या कर्जदाराना त्यांच्या मालमत्ता संदर्भात सुचना देऊन नोटीस बजावल्या यात आनेक कर्जदारानी काही प्रमाणात कर्जाचे हाप्ते भरले असून ते भरलेले हाप्ते बँकेने कर्जात वर्ग केले आहेत. या बाबत पाटील कुटुंबातील तक्रारी वरुन १५ लाख रूपयाचे घेतलेले कर्ज मुदतीत भरले नाही म्हणुन शेतकर्याच्या मालमत्तेवर नाशिक जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई ची तरतुद केली असल्याने सदर शेतकर्यासह संपूर्ण कुटुंब ञस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे ?

 

ही नोटीस नांदगाव तालुक्यातील शेतक-यांना9 शेतक-यांना आली असून त्यांची नावे अशी आहे. .१) सरस्वतीबाई लहिरे रा. भालुर ८ लाख ७० हजार, थकीत सन १४ मध्ये कर्ज घेतले,२)भिमा मोरे मुळडोंगरी सन १४ मधील थकीत रु १४ लाख, ३)दगेसिंह राजपुत्र बोराळे सन १४ मधील कर्ज थकीत ४२ लाख रु,४) भगीरथीबाई पाटील वाडाळी सन १९ मधील ४५ लाख रु, ५)तात्याबा जाधव मनमाड सन १९ थकीत ५ लाख ३१ ह .रु.६)अशोक निकम वंजारवाडी ८लाख ९१ ह रु,७) दुर्याधन/ सुनंदा कदम रा.पांझन देव सन १४ मधील थकीत २८ लाख रु,८) सुधीर मिसर. रा.माळेगांव सन १९ मधील थकित ५ लाख रु,९)रवींद्र मिसर सन १९ मधील थकित ५ लाख रु

नोटीस पुन्हा आली .

– तालुक्यातील वडाळी बु!! येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र सोमनाथ साहेबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात निवेदनाद्वारे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या धमक्याबाबत व काही कागदपत्रांवर जबरदस्तीने घेतलेल्या सह्याबाबत एक व्यथाच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मांडलेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील सोमनाथ पाटील यांच्या आजी भागीरथीबाई गुलाब पाटील व चुलते भागवत बद्रीनाथ पाटील यांनी 2013 मध्ये फार्म हाऊस साठी 1500000 ₹ कर्ज घेतले होते. त्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नांदगाव यांना शेत जमिनीचे काही कागदपत्र ताराण दिले होते. परंतु सतत चे अस्मानी संकट, दुष्काळ, अतिवृष्टी आदी कारणास्तव सदर कर्ज परतफेड करता आले नाही.

याबाबत बँकेने वेळोवेळी दिलेल्या नोटिसांवर सोमनाथ पाटील यांच्या कुटुंबातील त्यांच्या आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने व धमकावून सह्या घेतल्या होत्या.असा आरोप निवेदनात केला आहे. तसेच 30 जुलै 2024 रोजी एका जिल्हा दैनिकात जाहिरात देवून सदर फार्म हाऊस साठी तारण दिलेल्या जमिनीचे लिलाव करण्याचे कारस्थान रचून दि. 8/8/2024 रोजी जमिनीचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्याचे ठरवले होते.

परंतु याबाबत बँकेने पाटील यांच्या आजी व चुलते (कर्जदार) यांना जमीन लिलावाबाबत कुठलीही सूचना दिलेली नव्हती. त्यामुळे परस्पर लिलाव तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर गावातील एका व्यक्तीने त्यांना पेपर मधील जाहिरात बाबत सांगितल्यानंतर सदर बाबतीत पाटील यांच्या कुटुंबाला माहिती मिळाली. त्यानंतर सोमनाथ पाटील यांनी दिनांक 7/8/ 2024 रोजी मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाकडे अर्जफाटे करुन जमीन लीलाव प्रक्रिया थांबवण्यात यावी म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.

तुर्तास दिनांक 8/8/ 2024 रोजी सकाळी उपोषणाच्या अगोदर 2,00000 लाख भरणा करुन जप्ती प्रक्रिया थांबवण्याबाबत बँकेला रीतसर अर्ज देऊन विनंती केली होती. तसेच बँकेनेही सदर जप्ती प्रक्रिया थांबवून 2 लाख रुपये स्वीकारले परंतु ते व्याजामध्ये वळवले तशी पावती बँकेने दिली होती. परंतु उर्वरित कर्ज आम्ही लगेचच 2 महिन्यातच भरतो. किंवा 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भरतो. असे तोंडी किंवा लेखी जबाब दिले नव्हते. तरीही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी धमक्या देऊन माझ्या कुटुंबातील माझ्यासह माझी आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने काही कागदपत्रांवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेले अर्ज निकाली काढणे बाबत सह्या व अंगठ्याचे ठसे घेतल्यामुळे माझ्यासह माझे कुटुंबीय भयभीत झाले असून भीतीच्या वातावरणात वावरत आहे.

असे पाटील यांचे म्हणणे आहे. यास्तव पुन्हा दि. 10/9/2024 ला निवेदनाद्वारे कळविलेले आहे. त्यात आम्ही फार्म हाऊस साठी घेतलेले 15,00000 लाख उत्पन्नाच्या स्रोतानुसार टप्प्याटप्प्याने भरण्यास तयार असून आम्ही दिनांक 8/8/2024 रोजी भरणा केलेली 2,00000 लाख रक्कम व्याजात न वळवता मुद्दल मध्ये वळवावी. तसेच बँकेने व्याजात संपूर्ण सूट द्यावी. व मुद्दल चे 15 लाख टप्प्याटप्प्याने उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार भरण्यास मुभा द्यावी.

असे सोमनाथ पाटील यांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हाला बेमुदत / प्राणांतिक उपोषणासारखा मार्ग अवलंबवा लागेल. तसेच सदर प्रकरणी बँक पदाधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे व धमकावन्यामुळे घरातील व्यक्तींनी डोक्यात टेन्शन घेऊन आत्महत्या केली तर त्यास सर्वस्वी शासन आणि संबंधित पदाधिकारीच जबाबदार राहतील असेही सोमनाथ पाटील यांनी शेवटी म्हटलेले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!