नांदगाव मध्ये गाडी चालवताना तुमची गाडी जप्त होणार
वेगवान नाशिक / wegwan Nashik
नांदगाव, दि.14 सप्टेंबर 2024, शनिवार
(मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावर असलेल्या बोलठाण येथे नांदगाव पोलिसांनी दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी आठवडे बाजाराच्या दिवशी मोटरसायकल धारकांची मोहीम सुरू केली असून काही गाड्या जप्त करून त्यांना ऑनलाईन दंड केला गेला असल्याचे समोर येत आहे या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दंड सहन करावा लागला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील येथील नाक्यावर गावात शिरत असताना येथील नाक्यावर वाहने राहत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अडथळा निर्माण होत होता त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी बोलठाण येथील ऐन आठवडे बाजाराच्या दिवशी ही मोहीम सुरू केल्याने सर्वसामान्यांना याचा त्रास झाला.
ऐन बाजाराच्या दिवशीच ही मोहीम राबविल्याने बोलठाण येथील नाक्यावर एकही वाहन उभे राहिल्याचे दिसून आले नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली दिसली नाही मात्र मोटरसायकल वाढवून गाडी चे कागदपत्र पडताळणी करून त्या मोटरसायकल धारकांना ऑनलाईन दंड करण्याची सत्र सुरू करण्यात आल्याचे चित्र समोर आले.
या मोहिमेमुळे बोलठाण येथील बाजारात येणाऱ्या व गावाबाहेर जाणाऱ्या वाहतुकीची तोंडी झालेली दिसून आली नाही. त्यामुळे येथील नाक्यावर बघायच्या गर्दीशिवाय दुसरी गर्दी पाहायला मिळाली नाही. खेड्यातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक कष्ट मजुरी करून पाचशे रुपये बाजारासाठी घेऊन येऊन त्याची मोटरसायकल पकडल्याने त्याला 500 रुपयापासून पुढे दंड आकारला गेला असल्याने शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
ज्याप्रमाणे आज बोलठाण येथे ही मोहीम सुरू केली त्याचप्रमाणे सर्वच लहान मोठ्या वाहनांची कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना देखील दंड ठोठावण्यात यावा. कारण बोलठाण येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांरी कांदा विक्री करण्यासाठी वाहने आणत असतात. व येथील नाक्यावर खाजगी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे दररोज या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. फक्त सर्वसामान्य नागरिकांना मिठीशी धरू नये अशी चर्चा येथील सर्वसामान्य नागरिकांकडून व जमलेल्या बघणाऱ्या नागरिकांकडून चर्चा सुरू होत्या.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.