अखेर केंद्र सरकाने सोयाबीन मध्ये घातला हात ..सोयाबीन भावाचं काय होणार soybean rate
अखेर केंद्र सरकाने सोयाबीन मध्ये हात घातला.. Finally, the central government put its hand in soybeans.

वेगवान नाशिक
मुंबई, ता. 14 – सोयाबीनचे पीक महाराष्ट्रामध्ये 40% पिकवली जाते. मात्र या सोयाबीनचे गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये चांगलेच वांदे झालेआहे. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटा कुटीला आहे.
यंदा सोयाबीन शेतकऱ्यांना चार हजार रुपये दराने विकावी लागली, अशा दराने जर सोयाबीन विकली तर शेतकऱ्यांना यामधून कुठलाही पद्धतीचा फायदा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन सोडून मका पिकाकडे आपला कल वाढवला. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये सोयाबीनचे साठे पडून आहेत.
सोयाबीनला भाव वाढेल अशीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. यामध्येच आता केंद्र सरकारने हस्तक्षेप केलेला आहे. सोयाबीनचे भाव किती वाढणार आणि त्याची परिस्थिती काय असेल जाणून घ्या या माहितीच्या माध्यमातून.
सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न वाढणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या होत्या.
त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाने मागील आठवड्यातच सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काल खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी किती होते आयात शुल्क
कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी 5.5% आयात शुल्क होते ते आता 27.5% असेल तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या 13.75 टक्क्यावरून आता 35.75 टक्के इतके वाढवण्यात आले आहे.
