खेळ

या स्पर्धेसाठी देशभरातून तीनशे खेळाडू दाखल

तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय वरिष्ठ जम्परोप स्पर्धेला नांदेडमध्ये सुरुवात


22 व्या सब ज्युनिअर व तिसऱ्या ऑल इंडिया सीनियर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

दिन 12 ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड तेथे होत असलेल्या 22 व्या सब ज्युनिअर व तिसऱ्या ऑल इंडिया सीनियर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या स्पर्धेमध्ये पंजाब, जम्मू कश्मीर, दिल्ली, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून जवळपास 300 खेळाडू नांदेड नगरीमध्ये दाखल झाले आहेत.या स्पर्धेचा उद्घाटन दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा.नरेंद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

उद्घाटन समारंभ राष्ट्रीय जम्परोप संघटनेचे महासचिव साजाद खान, टोकियो ओलंपिक निरीक्षक अशोक दूधारे ,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे, पंचप्रमुख नथुराम जट, महाराष्ट्र संघटनेचे सचिव दीपक निकम, यशवंत महाविद्यालयाचे रजिस्टर संदीप पाटील,शिवाजी पाटील वाकडे प्रा.डॉ.रमेश नांदेडकर, डॉ मनोज पैंजणे प्राचार्य डॉ.बालाजी जाधव इत्यादी उपस्थित होते प्रास्ताविक डॉ राहुल वाघमारे त्यांनी केले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल चंदेल,आकाश मुगल ,शिवाजी जाधव, प्रियंका गायकवाड, आकाश क्षीरसागर,किरण नागरे ,वैजनाथ नावंदे राजू वाकडे, गंगासागर गोईन, वनश्री गाडगीळ, कन्हैया उमाकांत इत्यादी परिश्रम घेत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!