आता आला नकली लसूण, तुमच्या भाजीत नेमका कोणात लसूण
आता आला नकली लसूण, तुमच्या भाजीत नेमका कोणात लसूण

वेगवान मिडीया ( आनलाईन डेक्स )
नवी दिल्ली, ता. 12 सप्टेंबर 2024- आपल्या सगळ्यांच्या जेवणामध्ये लसूण हा फार महत्त्वपूर्ण आहे. लसूणाची जर नसेल तर आपलं जेवणाची चव बेचव झाल्यासारखे होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये चक्क नकली लसूण दाखल झालाय. आणि ही बाब जी आहे ती कस्टमर अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेली आहे.
जेवनामध्ये लसणाची फेडणी नसेल तर त्या जेवनाला काय चवं असं आपण म्हणतो. भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्राॅनिक वस्तू नकली येत होत्या मात्र मात्र नकली अंड्डे, नकली तांदुळ आता तरी नकलु लसणाची तस्कारी झाल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे.
भारत-नेपाळ सीमेवर सीमाशुल्क विभागाने 16 टन चिनी लसूण जप्त केले, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमध्ये या लसणात बुरशी आढळली, त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.
उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये सीमाशुल्क विभागाने 1,400 क्विंटल लसूण नष्ट करण्यासाठी जमिनीत गाडले. मात्र, अधिकारी घटनास्थळावरून निघून जाताच स्थानिक ग्रामस्थांनी लसूण खोदून तो नेण्यास सुरुवात केली.
हा लसूण पकडण्यात आल्यामुळे ही बाब समोर आली आहे. मात्र कदाचीच गुपचूप पणे हा लसूण महाराष्ट्रातील जेवनामद्ये तर गेला नाही ना अशी शंका उपस्थिती केली जातं आहे. जे घडलं ते समोर येतं मात्र ज्याची चोरी सापडली नाही त्याचे काय. त्यामुळे आपण एक जबाबद म्हणून आपल्या घरातील भाजीमध्ये नेमका कोणता लसून आहे याची तपासणी करणे गरजेचे आहे. आपण लसून खरेदी करतांना शेतक-याकडून खरेदी केल्यास अति महत्वाचे ठरणार आणि यामुळे तुमच्या आरोग्याचा धोकाही टळणार आहे.
चीनी लसूण लावणार वाट
गेल्या महिन्यात सीमाशुल्क विभागाने नेपाळमधून भारतात तस्करी करण्यात आलेला सुमारे 16 टन चीनी लसूण जप्त केला होता. हे चायनीज लसूण आरोग्यासाठी अत्यंत घातक असून त्यात आढळणाऱ्या बुरशीमुळे गंभीर आजार होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असतानाही स्थानिक ग्रामस्थ ते घेत आहेत. एका गावकऱ्याने सांगितले की, “आम्ही ते वापरण्यासाठी घेत नाही तर आमच्या शेतात लावण्यासाठी घेत आहोत.
