नाशिक- या बंधा-याला मोठी गळती, बंधारा फुटल्यानंतर होणार मोठं नुकसान

वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 12 सप्टेंबर 2024- जिल्ह्यातील अनेक पाझर तलाव पूर्ण क्षमतेना भरले असून अनेक बंधारे व धरणाच्या सांडव्यातुन खळखळा पाणी वाहत आहे . अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे सावधान राहण्याच्या दृष्टीने प्रशासन सुचना देत आहे. तर अनेक ठिकाणी अजून नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील असा पाझर तलाव आहे. ज्यातून पाण्याची गळतं वाढत असून ही गळती बंधार फुटण्याला अमंत्रण आहे. जर हा बंधारा फुटल्यास मोठं नुकसान होणार आहे.जाणून घेऊ नाशिक जिल्ह्यातील या गळती होणा-या बंधा-याबाबत.
नांदगांव तालुक्यातील साकोरा शिवारातील मोरखडी नदीवरील मोरखडी पाझर तलाव पूर्ण क्षमतेना भरला असून सांडव्यातुन खळखळा पाणी वाहत आहे .असे असले तरी मोरखडी बंधार्याला (पाझर तलाव ) गळती लागली असून दैनंदिन होणार्या पाणी गळतीतुन २४ तास एक एच पी चे पाणी पाझर तलावातून गळती होऊन वाहून जात आहे ? यदा कदाचित गळतीचे प्रमाण वाढल्यास नांदगांव वेहळगांव जानारा साकोरा शिवारातील राज्यमार्ग बंधारा फुटल्यास रहदारी रस्ता बंद होईल. मागील तिन वर्षापूर्वी असेच झाले होते.
या साठी मोरखडी पाझर तलावाची गळती वेळेत थांबवाबी अन्यथा मागील दोन तिन वर्षापूर्वी ची परिस्थिती ओढवु शकते तिन वर्षापूर्वी याच पाझर तलावाला गळती लागली आणी आठ ते दहा दिवसात बंधार्याच्या भिंतीला भगदाड पडून प्रचंड पाणी वाहून गेले व शिवारातील ५० एकर जमिनीवरील माती वाहून गेली व वेहळगांव रस्ता पावसाच्या पाण्यात तुटला होता.
व त्या जमिनीवर आजुन पुरेसे उत्तपन्न घेता येत नाही गत चार पाच दिवसा पासून मोरखडी पाझर तलावाला गळती लागली असून हा पांझर तलाव साकोरा ग्रामपंचायतीच्या मालकीचा आहे सन १९८० मध्ये देखील या पाझर तलावाला गळती लागून भगदाड पडून प्रचंड नुकसान झाले होते ति वेळा आता पुन्हा येऊ नहे यागोदर हा पाझर तलाव दोन वेळा फुटला होता.
यासाठी पांटबंधारे विभागाने गळती थांबवुन वाया जानारे पाणी थांबवावे या पाझर तलावाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात काटेरी बाभळी सह इतर लहान मोठे झाडे,झुडपे प्रचंड प्रमाणात पाझर तलावाच्या भरावा वर उगलेली व बहरलेली आहेत तसेच मागील वर्षी पाऊस न झाल्याने पाझर तलाव कोरडा होता.
त्यामुळे उंदीर घुशी यांनी बिळ तयार केले असतील त्यातुन पाणी गळती होत असेल सध्या पाणी गळतीने पाणी रस्त्यावरून आणी दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यानी पाणी मोठ्या प्रमाणात वाह असल्याने किती प्रमाणात पाणी गळती होते हे सांगणे कठीन आहे.
पाझर तलावाला लागून नांदगांव वेहळगांव ,गिरणाडँम,पळाशि, सावरगांव, जामधरी, कळमधरी, साकोरा,मळगाव,पिलखोड,काकळणे,मंगळणे आदी गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे .या पाझर तलावाची वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठी गाणी होऊ शकते आजुन पावसाळा काही दिवस बाकी आहे पाझर तलावात पावसाचे पाणी वाढल्यास संकट ओढवु शकते?
