सरपंच आडीच वर्षात एवढे लाख रुपये छापतो,तुम्हाला माहित आहे का !
सरपंच आडीच वर्षात एवढे लाख रुपये छापतो,तुम्हाला माहित आहे का !

वेगवान मि़डीया / साहेबराव ठाकरे
शेगाव, 11 सप्टेंबर 2024 – ( आनलाईन डिजीटल ) सरपंच होण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते . गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत राजकारणामध्ये प्रत्येकजण सत्तेत येण्यासाठी धडपडतो . मात्र सरपंच अडीच वर्षांमध्ये किती पैसे कमवू शकतो याची ही बातमी.
सरपंच पदासाठी एवढी चढाओढ का असते याचं हे ज्वलंत उदाहरण. मात्र आम्ही ज्या सरपंचाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्या सरपंचाकडून तुम्हाला आदर्श घेणे गरजेचे आहे. कारण एका सरपंचाची अडीच वर्षाची कमाई ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. सरपंच यांच मानधन फक्त नावाला असतं मात्र सरपंचाला किती कमिशन मिळतं याची ही संपूर्ण बातमी.
सरपंच म्हणून गावात होणाऱ्या प्रत्येक कामात त्याचा वेगळा कमिशन ठरलेला असतं. सरपंचाला कमिशन देणं हा पूर्वपार चालत आलेला लिखित नियम आहे. त्यामुळे कमिशन घेणं हा सरपंचाचा हक्कच बनला आहे. वेगळा प्रसंगी कमिशन न दिल्याने काम आडविणे, ठेकेदारांना विटीस धरणे असेही प्रकार होताना आपण पाहिले आहे.
सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक मात्र विविध कामाच्या माध्यमातून कमिशन घेत लाखोंचा मलिद जमा करण्याचा पद म्हणजे सरपंच, अशी प्रतिमा गत काही वर्षात निर्माण केली जात आहे. आणि ग्रामीण किंवा ज्या ठिकाणी सरपचं पदाची जागा आहे त्याकडे त्या दृष्टीने पाहिले जाते.
त्यात महिला सरपंच असल्यास संपूर्ण कारभार पतीच्या हातात असतो आणि महिला राज नव्हे तर प्रत्येक गावात आजही आपल्याला पतीराज दिसतो. महाराष्ट्रातला एक तालुका आहे. ज्या तालुक्याचे नाव आहे शेगाव, त्या तालुक्यामध्ये एक गाव आहे जळंब नावाचं, या गावांमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे.
मलिदा लाटण्यासाठी हे गाव मात्र याला अपवाद ठरलाय, याचे कारण म्हणजे येथील महिला सरपंच मंगलाताई घोपे या आहेत. अडीच वर्षात त्यांना किती कमिशन देण्यात आलं आणि ते कमिशन किती होतं याचा आकडाच त्यांनी गावासमोर खुलेआमपणे मांडला.
कमिशन मधून रीतसर त्यांनी काय साध्य केलं तेही त्यांनी गावासमोर सांगितलं. त्यांना मिळालेले कमिशन त्यांनी गावाच्या विकासासाठी वापरलं, अडीच वर्षाच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी गावात एक मोठा कार्यक्रम घेऊन संपूर्ण गावकऱ्यांसमोर कमिशनचा हिशोब त्यांनी मांडला.
कमिशन म्हणून मिळालेल्या 22 लाख 77 हजार पाचशे रुपयांचा हिशोब त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. एवढा नव्हे तर अडीच वर्षात केलेले विकास काम, त्यांचे इस्टिमेट, मिळालेले निधी, झालेल्या खर्च आणि कमिशन याचा संपूर्ण घोष वाक्य पुस्तकात नमूद करून हे पुस्तक गावकऱ्यांसमोर सादर केलं.
त्यामुळे गावतील ग्रामस्थ पण अवकं झाले. या काळामध्ये विकास कामे करण्यासाठी ज्या ज्या लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ गावकरांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदत केली त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. असे सरपंच जर संपूर्ण महाराष्ट्रात तयार व्हायला लागले तर महाराष्ट्राचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मात्र मलिदा लुटण्याच्या नादात सरपंच पद लढवणाऱ्या या भ्रष्टाचारी लोकांना गावातल्या लोकांनी सरपंच कसा निवडायला हवा यावरून हे सगळं अधोरेखित होतं.
कोणत्या कामात किती कमिशन घेतलं कोणीचा कोणाला सांगता नाही. हे सर्व गुपचिप असतं, परंतु आपण अडीच वर्षात किती कमिशन घेतलं याचा हिशोब गावकऱ्यांसमोर मांडण्याचे काम एका महिला सरपंचांना केलेला आहे.
शेगाव तालुक्यातील जळंब या गावच्या त्या सरपंच असून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासह संपूर्ण गाव एक जागी आणण्याची किमया त्यांनी केली आहे. वर्षाच्या काळात मिळालेल्या कमिशनचा हिशोब त्यांनी गावकऱ्यांना दिला आहे. त्या राज्यातील पहिला महिला सरपंच ठरले आहेत की ज्यांनी आडीच वर्षात मला 23 लाख रुपये कमिशन मिळाल्याचे जाहिर सांगितले आहे. सध्या या सरपंचच्या वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण सोशल मिडियावर व्हायरलं होऊ लागलेले आहे. वेगवान नाशिक फक्त तुम्हाला ही बातमी कशी आहे हे अवगत करण्यासाठी माहिती दिली आहे. हा 2023 मधील कार्यकाळातील विषय आहे. हे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजेत. पण यात सरपंच किती दिलदार आहे. हे महत्वाचे आहे.
