जरांगे- दराडे भेटी मागं दडलंय काय? आ.किशोर दराडेंनी जरागेंची घेतली दुसर्यांदा भेट
जरांगे- दराडे भेटी मागं दडलंय काय? आ.किशोर दराडेंनी जरागेंची घेतली दुसर्यांदा भेट
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/दराडे-जरांगे-भेट-780x470.jpg)
वेगवान मिडीया / अरुण थोरे
नाशिक, ता. 11 सप्टेंबर 2024- राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणून येवला लासलगाव मतदार संघाकडे पाहिला जाते. या मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात अनेक उमेदवार इच्छुक असताना विधानपरिषद आमदार किशोर दराडे यांनी मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांची दोन आठवड्यात दोनदा भेट घेतल्याने, आता मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.
माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मनोज जरंगे पाटील यांच्यातील वाक् युद्ध सर्वश्रुत आहे मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा भुजबळ यांना विरोध करत, “येवल्यातुन भुजबळला निवडून येऊ देणार नाही” अशा प्रकारचे आव्हान उभे केले असताना आमदार किशोर दराडे यांनी जरांगे यांच्या भेटीमागे आपले पुतणे कुणाल दराडे यांच्या आमदारकीच्या अनुषंगाने भेट तर नसावी अशा चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे.
याभेटी मागील कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी, कुणाल दराडे यांना उमेदवारी मिळाल्यास मदत करावी, यासाठी ही भेट होती की आणखी दुसरे काही कारण असावे हे पुढील काळात स्पष्ट होईल.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)