मोठ्या बातम्या

महाराष्टात मोबाईल वापरताय मग तुमच्या बॅंकेतील पैसे काही क्षणात जाणार !

मोबाईल वापरताय मग तुमच्या बॅंकेतील खात्यामधील पैसे काही क्षणात लंपास होणार


वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव 

मुंबई, ता.  11 सप्टेंबर 2024- सध्याचे युग मोबाईल युग झाले आहे. कारण मोबाईल शिवाय तुमचा दिवस जात नाही. आणि हे ओळखून तुमचा परफेक्ट कार्यक्रम लावण्यासाठी पडद्यामागे कंबर कसण्यास सुरु झाली आहे.मोबाईल चा वापर आणि व्हॅाटस्अपचा वापर करणा-या लोकांच्या खात्यामधील  पैसे काही क्षणामध्ये लंपास होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही मोबाईल वापरत असला तर ही बातमी संपूर्ण वाचा जेणे करुन तुमच्यामुळे इतर लोकांना पण त्याची माहिती  होईल. If you use mobile then the money in your bank will go in a few moments

 

सध्या ऑनलाईन मध्ये फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हॅकर किंवा फसवणूक करणारे लोक एसएमएसद्वारे, मेलद्वारे फसवी लिंक पाठवतात आणि त्याचा थांगपत्ता युजरलाही लागत नाही.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

संबंधित लिंक क्लिक करताच आपल्या फोन किंवा संगणकावर असा एक मालवेअर डाऊनलोड होतो की, काही सेंकदातच आपले खाते रिकामे होते.

 

नागरिकांच्या इंटरनेट वापरात एकीकडे विकास होत असताना फसव्या लिंक व्हायरल करून फसवणूक प्रकार देखील वाढू लागले आहेत. अशा फसव्या लिंक पासून नागरिकांच्या फसवणुकीत वाढ होत आहे. अशा फसव्या लिंकपासून सावध राहवे .

 

काही शासकीय योजना म्हणून फसव्या लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. सध्या लाडकी बहीण, पीएम किसान, सोलर पम्प आदी फसव्या लिंक सोशल मीडिया वर फिरत आहे. लोकांची फसवणूक करण्यात येत आहेत, फसव्या लिंक ओपन करू नये. तसेच आपल्या मोबाइलला आलेला ओटीपी शेअर करू नये. त्याचप्रमाणे अनोळखी अप डाऊनलोड करू नये.

 

सौर कृषी पंपा चा लाभ अनेक शेतकरी बांधवानी अशा फसव्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर केले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्यासाठी कृषी पंप आवश्यकता असेल तर सावध व्हा. कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करून पैसे देवू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

 

महत्वाचे 

तुम्ही व्हॅाटसअप वापरत असेल तर तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये फक्त एडमीन पोस्ट टाकु शकतो असा असला पाहिजेत. नाही तर ग्रुपमध्ये कोण कधी जॅाईन होतो. आणि ग्रुपवर एखांदी लिंक टाकतो. किंवा apk टाकतो. तुम्ही सर्वजनिक ग्रुपमध्ये असतात. आणि तुम्हालाचं लक्षात येत नाही की सदर मेसज कोणी टाकला आहे. आणि जो टाकतो ते ग्रुपमधून लेप्ट होतो. आणि त्याचा नंबर तुम्हाला समजला तरी तो हॅकर तुमच्या हाती लागत नाही. त्यामुळे तुम्ही सार्वजनिक ग्रुपमध्ये असला तर अश्या लिंकवर क्लिक करु नका, ग्रुपवर पडणार मेसज नेमका काय आहे. हे तपासून पहा.

 

एसएमएस

तुमचा मोबाईल नंबर मिळवून तुम्हाला एक मेसज पाठविला जातो. ज्यावर तुम्ही क्लिक करताचं तुमचा मोबाईल हॅक होऊन बॅंक खात्याबरोबर तुमचं सगळं गुपीत चोरीला जातं.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!