महायुतीचा पुढाचा मुख्यमंत्री अजित पवार होणार? नाही तर टांगे पलटी घोडे फरार

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 10ऑगस्ट 2024/महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची बिगुल काहीदिवसात वाजणार आहे. त्यामुळे काही दिवसांपासून रोज महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापाथक घडत आहेत.
होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वादंग सुरु आहे.
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत हा प्रस्ताव मांडल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.
होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते.
राज्य भाजपच्या कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी रविवारी रात्री निवडणुकीची तयारी आणि जागा वाटपासंबंधी चर्चा केली.
महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी आणि निवडणूक रणनीतीसंबंधी सूचना करून त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केलीआहे
अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना अजित पवार गैरहजर होते.
त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. अशातच एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह दिल्लीकडे रवाना होण्याआधी मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मुंबई विमानतळावरच बैठक पार पडली.
बैठकीत अजित पवार यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली. मला मुख्यमंत्री करा, अशी इच्छा अजित पवार यांनी अमित शहांकडे उघडपणे बोलून दाखवली. त्यासाठी अजितदादांनी बिहार पॅटर्नचा दाखलाही दिला.
महायुतीनं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घोषित करावे, असे सांगितल्याची माहिती आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज झाल्याची माहिती आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या मागणीला अमित शहा नेमका काय निर्णय घेणार ?

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये