सामाजिक कार्यकर्ते अॅड. जाधव गोळीबारप्रकरण : आणखी दोघांना अटक
सामाजिक कार्यकर्ते अॅड. जाधव गोळीबारप्रकरण : आणखी दोघांना अटक
वेगवान नाशिक /नाशिक नितीन चव्हाण ता :, १० सप्टेंबर २०२४
सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणातील फरार मुख्य सुत्रधाराच्या संपर्कात असलेल्या दोन युवकांना अटक केली आहे.
दोघांसह अन्य ३ आरोपींना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अंकुश लक्ष्मण शेवाळे (रा. सावता नगर, नाशिक) व प्रसाद शिंदे (रा. नांदुर नाका, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, अॅड. जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी 2022 रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बुरकुले हॉल जवळ तीन संशयितांनी गोळीबार केला.
त्यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुंडाविरोधी पथकाने संशयित आरोपी आकाश आनंदा सूर्यतळ याला ताब्यात घेतले.
त्याने त्याच्या तीन साथीदारांचे नाव घेतले होते. त्यातील दोन संशयित श्रीकांत वाकोडे ऊर्फ बारक्या व सनी पगारे ऊर्फ टाक्यावरील दोघे संशयित एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहेत.
त्यांना तेथून ताब्यात घेण्यात आले. यातील एक संशयित आरोपी फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे .
दरम्यान यातील फरार संशयित मयूर बेत (रा. फर्नांडिसवाडी, नाशिक) याच्याशी संबध असल्याच्या संशयावरून अंकुश लक्ष्मण शेवाळे व प्रसाद शिंदे यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.