झोपमोड केल्याचा आला राग आला अन :,डीजे ऑपरेटरवर वार केला
झोपमोड केल्याचा आला राग आला अन :,डीजे ऑपरेटरवर वार केला
वेगवान नाशिक /नाशिक नितीन चव्हाण ता:, १०/ सप्टेंबर २०२४
डीजे ऑपरेटरचे काम आटोपून घरी जाण्यासाठी डीजे मालकाची रिक्षा घेण्यासाठी हिरावाडीतील कमलनगरमध्ये गेल्यानंतर रिक्षात झोपलेल्या दोघा जणांना आवाज देत उठविल्याच्या कारणावरून डीजे ऑपरेटरला बांबूने मारहाण केली. तसेच धारदार कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत म्हसरूळ राजवाडा येथे राहणाऱ्या फिर्यादी किरण बंडू पगारे याने दिलेल्या तक्रारीवरून दोघा अज्ञात हल्लेखोरांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या रविवारी (दि.८) पगारे हे डीजेचे काम आटोपून घरी जाण्यासाठी हिरावाडी कमलनगर येथे मालकाची रिक्षा घेण्यासाठी गेला होते.
रिक्षात दोघे जण अगोदरपासून झोपलेले होते. त्यावेळी पगारे याने दोघांना हाक देत उठविले.
त्याचा राग आल्याने संशयितानी पगारे याला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली.
त्यानंतर कमरेला लावलेल्या कोयत्यासारख्या धारदार वस्तूने डोक्यात वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमीला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी पोलिसांनी साक्षिदारांचे जबाब नोंदवून घेतले आहे.