गुरुवारपासून तीन दिवस या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ विभागात गालन स्थानक येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

भुसावल विभागात गालन स्थानक येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक
भुसावल विभागाच्या इगतपुरी-भुसावल खंड दरम्यान गालन स्थानक येथे अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.
या नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यांमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
मेल/एक्सप्रेस गाड्यांचे रद्दीकरण
1. ट्रेन क्रमांक 12114 नागपूर – पुणे एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 रोजी रद्द.
2. ट्रेन क्रमांक 12113 पुणे – नागपूर एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 14.09.2024 रोजी रद्द.
3. ट्रेन क्रमांक 11025 अमरावती – पुणे एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
4. ट्रेन क्रमांक 11026 पुणे – अमरावती एक्सप्रेस, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
5. ट्रेन क्रमांक 11119 इगतपुरी – भुसावल मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
6. ट्रेन क्रमांक 11120 भुसावल – इगतपुरी मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
7. ट्रेन क्रमांक 11113 देवळाली – भुसावल मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
8. ट्रेन क्रमांक 11114 भुसावल – देवळाली मेमू, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
9. ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा – नासिक विशेष, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
10. ट्रेन क्रमांक 01212 नासिक – बडनेरा विशेष, प्रवास दिनांक 13.09.2024 आणि 14.09.2024 रोजी रद्द.
11. ट्रेन क्रमांक 02187 रेवा – मुंबई विशेष, प्रवास सुरू दिनांक 12.09.2024 रोजी रद्द.
12. ट्रेन क्रमांक 02188 मुंबई – रेवा विशेष, प्रवास सुरू दिनांक 13.09.2024 रोजी रद्द.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.
