मोठ्या बातम्या

नाशिक: तुमच्या घरात कोणी आहे का ? असे विचारून ते घरात घुसतात ( व्हिडीओ )


वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी

नाशिक, ता. 9 सप्टेंबर 2024-  जिल्ह्यामध्ये दहशतीला काही कमी नाही. कारण कधी बिबट्या, तर कधी अपघात, कधी चोरी तर कधी दरोडा, तर कधी शेती माल लंपास तर कधी काय मात्र आता नाशिक जिल्ह्यात मुलं व महिला सुरक्षीत नाही याचा प्रत्यय जिल्ह्यातील बागलाण तालुक्याल आला.

नाशिक जिल्ह्यामध्ये असे लोक फिरत आहे की जे तुमच्या पोरा पोरींवर लक्ष ठेवून आहे. त्यांना लंपास करुन तुमच्या कडून लाखो रुपये कसे मिळविता येतील असा या महाठगाचा डाव आहे. अशी एक घटना बागलाण मधील किकवारी येथून समोर आली आहे.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

पश्चिम भागातील किकवारी बुद्रुक गावाजवळ असलेल्या वागदर शिवार येथे भास्कर अहिरे यांच्या शेतातील घरी दुपारी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न फसला.मुलाचे वडील कामानिमित्त सटाणा येथे गेले होते.व आई पूजेसाठी घराबाहेर गेली असता दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकल ने तीन अनओळखी इसम घरामध्ये घुसून आले.

 

घरामध्ये कोण – कोण आहे यांची संपूर्ण माहिती विचारत दोन इसम परत जातात तर एक तिथेच थांबून बॅगेतून पिस्तूल काढत मुलाच्या डोक्याला लावत घरात दागिने कुठे ठेवले आहेत असे विचारतो मात्र मुलांच्या लक्षात आलं की सदर बंदूक नकली आहे. तेव्हा त्यांनी त्याला प्रतिसाद न देता त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र त्याच्याकडे अजून एक हत्यार असल्याने मुल घाबरले व तो इसम घरात झाडाझडती घेऊ लागला हाती काही न लागल्याने चिडून मुलांचे हातपाय बांधून शेतातील मका पिकात घेऊन गेला मुलाचे हात पाय बाधून व मुलाच्या वडील यांना फोन करून दहा लाख रु.खंडणी मागू लागला. मुलांच्या वडिलांनी लगेच शेतातील शेड वरील संतोष व सचिन यांना फोन करून घरी जायला लावले. नेमका प्रकार काय आहे. तो कळवण्यास सांगितले त्याचवेळी त्यांच्या भावाचा फोन आला त्याचा मुलगा स्वप्नील व मित्र सार्थक यांना एका  व्यक्तीने  मक्याच्या शेतात बांधून ठेवले असून त्यांचा पाठलाग करून लोकांनी पकडले आहेत.

 

त्यामुळे त्यांनी लगेच सटाणा पोलीस स्टेशनला जाऊन महिती कळून तेही घराकडे निघाले. मुलांच्या काकांनी व शेजारील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्यास पकडून आणले.त्यानंतर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी त्यावेळी त्यांची बॅग घटनास्थळावरून घेतली असता तिथे एक नकली बंदूक व कत्त्ती आढळून आली.सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचे नाव सुनील पवार (२४)असून राहणार चिखली गडद तालुका अहवा गुजरात असे सांगितले.

 

वरील घटना लक्षात घेता ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमानात भोंदूगिरी वाढली असून चोरटयांनी नवीन धंदा माडला असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!