त्या व्यक्तीला रेल्वेच्या डब्यावर चालणे पडले महागात
त्या व्यक्तीला रेल्वेच्या डब्यावर चालणे पडले महागात

वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दि.8 सप्टेंबर 2024, रविवार (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव रेल्वे स्टेशनवर दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास कुशीनगर व महानगरी एक्सप्रेस आले असताना एक माथेफिरू व्यक्ती रेल्वेच्या डब्यावर चढला होता. अतिउच्च दाबाच्या ओव्हर हेड ताराजवळ तो फिरत असताना त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्नात रेल्वे सुरक्षा बलाचा बराच वेळ खर्च झाल्याने रेल्वेच्या बोगीवर चढलेल्या त्या प्रवाशाला न्यायालयाने 1000 रुपयाचा दंड ठोठावला आहे.
गेल्या 4 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी जनता एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये थांबली असता गया जिल्ह्यातील बिहार येथील राजेंद्र सिंह वय वर्षे 28 हा युवक त्या रेल्वेगाडीतून प्रवास करत होता. नाशिकला जाणार हा युवक बसलेल्या डब्यातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने त्याने मोकळ्या हवेत प्रवास करण्याच्या नादात रेल्वे गाडीच्या टपावरच चढला. लोहमार्गाच्या अतिउच्च दाबाच्या ओव्हरहेड तारा जवळ तो फिरत असताना आढळून आल्याने नांदगाव रेल्वे स्थानकावरील अनेक जण धास्तवले.
मात्र त्याच्याकडे प्रवासाचे तिकीटही होते. या सगळ्या प्रकारामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. नांदगाव न्यायालयाने त्याने सर्व प्रकार सांगितल्यानंतर न्यायालयाने त्या व्यक्तीला 1000 रुपये दंड ठोठावत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक डी के तिवारी व समाधान पाटील यांनी त्याला खाली उतरण्याचा प्रयत्न केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करून तो नांदगाव रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या महानगरी व कुशीनगर या दोन्हीही गाड्यांच्या तपावर फिरू लागल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अति उच्च दाबाचा ओव्हर हेडचा विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. सुरुवातीला तो वेळ सर असावा असा अनेकांचा समज होता.
