वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दि.8 सप्टेंबर 2024 रविवार (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड शहरांमध्ये शिवभक्तांसह मराठा समाज व बहुजन समाजातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्रा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होती. ती सुमारे 50 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आली. मात्र दुर्दैवाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लावण्यात आलेली मेघडंबरी ही तिसऱ्या वेळी गळत आहे. यामुळे शिवप्रेमीसह बहुजन समाजाने नाराजी व्यक्त केली असून किमान महापुरुष यांच्या कामात तरी कॉलिटी ठेवा असा आरोप करत श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांची कामाची ऑडिट करावे व दोषी असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांच्यासह संबंधित सर्व घटकांना कठोर शासन करावी अशी मागणी पंकज खताळ यांनी केले आहे.
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण कृती पुतळी बसविण्यात आले. मात्र या पुतळ्यांची काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लावण्यात आलेली मेघडंबरी हे गळत आहे. मागे देखील या मेघडंबरीतुन पाणी गळत होते. त्या गोष्टींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र याला तरी राजकीय वळण देऊ नका असे म्हणत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नंतर पुन्हा एकदा या मेघडंबरीतून पाणी गळत आहे. याबाबत पंकज खताळ यांनी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून जाब विचारला. किमान महापुरुष यांच्या कामात तरी दर्जा ढासाला नाही पाहिजे. मात्र यावर कोणीही बोलत नाही. नव्याने आलेली सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची ऑडिट करून त्यांचा दर्जा त्यांचा दर्जा तपासण्यात यावा जे कोणी अधिकारी, ठेकेदार चुकीचे असतील चुकीचे असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंकज खताळ यांनी केली.
राजकोट येथील झालेली दुर्घटना ताजीच आहे. तशी वेळ नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात येऊ नये असेही पंकज खताळ यांनी म्हटले आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.