सरकारी माहिती

आता गावातील प्रत्येक तरुणाला 10 हजार पगार मिळणार, सरकारने काढला हा उपक्रम

आता गावातील प्रत्येक तरुणाला 10 हजार पगार मिळणार, सरकारने काढला हा उपक्रम Now 10,000 salary to every youth in the village, this plan was built


वेगवान मिडीया / साहेबराव ठाकरे

मुंबई दि. 8 : महाराष्ट्र मध्ये सध्या योजनांचा पाऊस पडत आहे महाराष्ट्रातील अनेक महिलांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व मंत्रिमंडळांनी लाडकी बहीण योजना काढून सर्व महिलांना खुश केलेला आहे कारण आता त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला जमा होत आहे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झालेले आहे. Now 10,000 salary to every youth in the village, this plan was built आणि आता तरुणांना पण महिना 10 हजार रुपये पगार मिळणार आहे.

 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

उर्वरित जे पैसे आहेत तेही इतर महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार असल्यामुळे राज्यामध्ये विद्यमान सरकारचा गावगावा आहे यामध्येच महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक नवीन योजना आणली आहे आणि या योजनेमध्ये आता गावातील तरुणाला दहा हजार रुपयांचा मानधन देणार आहे हे मानधन आता दरमहा मिळणार असल्याचं माहिती समोर येत आहे.

 

सदर योजना कोणती आहे हे जााणून घ्यासाठी आपण संपूर्ण बातमी वाचणे महत्वाचे आहे.

 

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!