वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 8ऑगस्ट /येवला तालुक्यात जून महिन्यापासूनच हुलकावणी देत असलेल्या पावसाने दोन – तीन वेळा हजेरी लावली. मात्र पोळ्याला दिवसभर बरसत राहिला.असे असले तरी जमिनीमध्ये एक ते दीड फुटाच्या खाली ओल गेलेली नाही. त्यामुळे जलस्रोत आजही कोरडेठाक आहे. मात्र परतीचा का होईना बरसेल, या आशेवर शेतकऱयांनी कांद्याचा जुगार खेळला आहे. तालुक्यात तब्बल हजारो हेकटरवर खरीप कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे.
तालुक्यातील आठही मंडळात थोड्याफार फरकाने पावसाची सरासरी सारखीच आहे. त्यामुळे त्यामुळे विहिरींना, नद्या – नाल्यांना पाणी उत्तरेल एवढा पाऊस न झाल्याने अद्यापही दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. येवला तालुक्यात यावर्षी जून मध्ये १२८.२, जुलै १४४.५ तर ऑगस्ट मध्ये १२६.८ इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सप्टेंबर ४२.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
गेल्यावर्षी आजपावेतो १८९ मिमी पाऊस पडला, मात्र यंदा त्यात वाढ झाली असून सरासरी ४५३ मिनी पाऊस तीन महिन्यात पडला आहे. भौगोलिक दृष्ट्या चार भागात तालुका विभागला असल्याने पाऊसही विषम प्रमाणातच होतो. काही भागात चांगला तर काही भागात अत्यल्प पाऊस झाला. अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात पावसाचा असमतोलपणा येथील शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत असतो. तरीही रिमझिम पावसामुळे खरिपाची पेरणी मार्गी लागली असून पिके वाचल्याचे समाधान आहे.
तालुक्यात सरासरीपेक्षा पडलेला पाऊस काही प्रमाणात अधिक असला तरीही आठही मंडळामध्ये हा पाऊस पुरेशा प्रमाणात पडलेला नाही. त्यामुळे अजूनही विहिरींना, कूपनलिकांना पाणी उतरलेले नाही. जिल्हाभर पाऊस पडत असताना येवला तालुक्यात तेवढ्या दमदारपणे पाऊस झालेला नाही. परंतु नाशिक जिल्ह्माच्या धरण क्षेत्रात दमदारपणे पाऊस झाल्याने विविध धरणातून येवला तालुक्यातील वितरिकांना व नद्यांना पालखेड डावा कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने तूर्तास जनावरांच्या पाण्याची चिंता मिटली असली तरीही अजूनही जमिनीत ‘पाणी जिरण्याच्या दृष्टीने दमदार पावसाची अपेक्षा” आहे.
तालुक्यात यावर्षी मका लागवड क्षेत्र ४२ हजार हेक्टर असून योग्य दर मिळत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे. १८ हजार हेक्टरवर सोयाबील पेरणी झाली. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या दृष्टीने मुगाची पेरणी केली होती.
आता मूग बाजारपेठेत पोहोचवून हजारो हेकटरवर कांदा लागवड झाली आहे. मात्र दमदार पाऊस झाला नाही तर कांदा उत्पादन कमालीचे घटणार आहे.
येवला तालुक्यातील आठही मंडळात पावसाचे प्रमाण जेमतेम राहिले आहे. सर्वाधिक पाऊस सावरगाव मंडळात झाला असून १५०.५ इतका पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद झालेले अंदरसुल मंडळ असून तेथे फक्त ९७. मिमी पाऊस पडला आहे.
मांजर पाडा प्रकल्पाचे पाणी थेट डोंगरगाव पर्यंत पोहोचल्याने व त्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील तलाव, बंधारे भरण्याचे काम सुरू असल्याने जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास निकाली निघाला असला तरी, तालुक्यात सध्या केवळ आहेरवाडी या दोन ठिकाणी टँकर सुरू आहेत.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये