या तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचे पुन्हा तांडव, पहा कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट
या तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचे पुन्हा तांडव, पहा कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवलाः दि. 8 सप्टेंबर 2024- खात्याने पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहेत. मराठवाडा विदर्भ काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे इशारा दिलेला आहे.
मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर असेल. धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, धाराशिव, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केलेला असून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नंदुरबार, संपूर्ण कोकण किनारपट्टी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहेत.
आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज हवामान विभागानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये