
वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव,दि.7 सप्टेंबर 2024, शनिवार (मुक्ताराम बागुल) गणेशोत्सव आला की मनमाड, लासलगाव आणि नाशिक यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील चाकरमान्यांना वेद लागते ते म्हणजे धावत्या प्रवासी रेल्वे गाडीत बसणाऱ्या गोदावरीच्या राजाची. मात्र यावर्षी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी रेल्वे गाडीत गणरायाची स्थापना करण्यास परवानगी मिळाली नसल्याने गोदावरीच्या राजाला ब्रेक लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या 27 वर्षापासून मनमाड – लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला मनमाड गोदावरी एक्सप्रेस मधील मासिक पासबुक बोगीमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवासी रेल्वे गाडीत देखील बोगीत गणरायाची स्थापना करून दहा दिवस तुझ्या आरती करण्यात येत होती. यामुळे धावत्या रेल्वे गाडीत गणेशोत्सव म्हणून राज्यात आणि देशात गोदावरी राजाची नदी ओळख निर्माण झाली होती.
मात्र कोविड काळापासून मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद करून त्याच वेळेस प्रति गोदावरी म्हणजे मनमाड दादर, दादर मनमाड स्पेशल सुरू करण्यात आली. त्यानंतर काळानंतर समज पेशल बंद करून धुळे दादर प्रवासी रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या धावत्या रेल्वे गाडी गणरायाची ओळख असलेल्या गोदावरीचे राजाची कशी स्थापना करावी याचा प्रश्न चाकरमान यांना पडला.
गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. गोदावरीच्या राज्याची स्थापना करण्यासाठी चाकरमान्यांची रेल्वे प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न केल्यामुळे शेवटी धावत्या प्रवासी रेल्वे गाडीतील गोदावरीच्या राजाला ब्रेक घ्यावी लागले.
