नाशिक ग्रामीण

” पिण्याच्या पाण्यात “दुध डेअरी फार्म चे घाण पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

स्वराज्य पक्ष आणि ग्रामस्थांनी सिन्नर तहसील कार्यालयावर केले हातोडा आंदोलन ..!


वेगवान नाशिक / भाऊसाहेब र हांडोरे

सिन्नर : दि. ४ सप्टेंबर — तालुक्यातील हारसुले गावातील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या शासकीय यंत्रणा जाग आणण्यासाठी स्वराज्य पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील लोकांच्या पुढाकाराने  सिन्नर तहसील समोर सिन्नर स्वराज्य व हरसुलेकरांनी हातोडा आंदोलन करण्यात आले आहे.

 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

पिण्याच्या पाण्यात मिक्स होणार डेअरीच घाण पाणी बंद करण्यासाठी सिन्नर स्वराज्य पक्ष व हरसुले ग्रामस्थ यांनी तहसील समोर तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातोडा आंदोलन ३/९/२०२४रोजी १२ ते १२.३०वा.करण्यात आले .

 

तहसिलदार देशमुख साहेब व नायब तहसिलदार मुंदंडासाहेब यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत न्याय देण्याची हमी दिली.
यावेळी हातात हातोडे(घन) घेऊन डेअरी मालकाचा निषेध करण्यात आला आहे.

 

यावेळी आंदोलकांनी धरणात येणार डेअरीच घाण पाणी बंद झालच पाहिजे.घाण पाणी सोडणारया डेअरी मालकावर कारवाई झालीच पाहिजे.

 

हरसुले येथील गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे. हरसुलेकरांचे आरोग्य वाचवलेच पाहिजे.हरसुलेकरांना न्याय मिळालाच पाहिजे.अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

श्री,शरद शिंदे यांनी यापूर्वी सरणावर बसून केले होते अनोखं आंदोलन ….

हरसुले

थील दुध डेअरी कंपनीचे विषारी सांडपाणी हरसुले बंधारयात सोडल्याने ग्रामस्थांचे आरोग्य ,जीव धोक्यात. ते विषारी सांडपाणी बंधारयात सोडणे थांबवुन कंपनीवर कारवाई करत न्याय देणे बाबत.

माननीय महोदय

 

आपणास स्वराज्य पक्ष व हरसुले ग्रामस्थ विनंतीपुर्वक कळवितो की हरसुले गावात बंधारा आहेत. सदर बंधारयात शासकीय निध

विहीर खोदून पाईपलाईन टाकून हरसुले गावाला पाणीपुरवठा योजना राबवलेली आहेत.सदर बंधारयावर गावची शेती व कुटुंब अवलंबून आहेत .परंतु सदर बंधारयात हरसुले येथील डेअरी कंपनीचे विषारी सांडपाणी सोडल्याने हरसुले गावचे आरोग्य धोक्यात आले आहेत. विषारी सांडपाण्याने बंधारयातील पाणी दुषीत झाले आहेत.

 

तेच दुषीत पाणी ग्रामपंचायत गावाला पाजत आहेत. त्यामुळे अनेक महिला, मुल,वयोवृद्ध साथीच्या रोगाने आजारी पडले आहे सदर रगेल,बेजबाबदार मालकाला अनेक वेळा ग्रामस्थांनी सांगुनही सदर बेफिकिरी मालक हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.विशेष म्हणजे सदर डेअरी, कंपनीचे मालक सिन्नर तालुका विधानसभेचे ४वेळा आमदार माणिकराव कोकाटे साहेब आहेत. त्यांची जनतेची जबाबदारी असताना बेफिकिरी दाखवत आहेत व खासदार वाजेही लक्ष देत नाहीत.मग यांना लोकप्रतिनिधी का करायचे?त्यांचा जाहीर निषेध.

 

सदर मालकावर कारवाई करुन सदर डेअरीचे कंपनीचे विषारी सांडपाणी सदर बंधारयात सोडणे थांबवावे यासाठी मंगळवार दि.३/९/२०२४रोजी सकाळी११.३०वाजता तहसील समोर लोकशाही पध्दतीने हातोडा आंदोलन करत मागणी करत आहोत. आपण न्याय देत हरसुले ग्रामस्थांचे जीव वाचवावे हि विनंती.अन्यथा लोकप्रतिनिधी यांची गाडीपुढे झोपणार.आमरण उपोषण आंदोलन करणार ——

शरद तुकाराम शिंदे पाटील
सिन्नर तालुकाप्रमुख
स्वराज्य पक्ष सिन्नर व ग्रामस्थ हरसुले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!