News rain समुद्रात कमी दाबाचे चक्रीवादळ या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
News rain समुद्रात कमी दाबाचे चक्रीवादळ या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
वेगवान
पुणे, ता. 6 सप्टेंबर 2024- Weather update निर्सग चं काही सांगता येत नाही. हवामान खाते त्याच्या हालचाली नुसार अपडेट देत असते. हवामान खाते हा अंदाज यंत्रनेद्वारे देत असते. मात्र हा निसर्ग आहे. त्यामुळे आपण हवामान खात्याला दोष देत असतो. मात्र ते सरासरी चुकीचे आहे. सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय वाऱ्यांचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील पावसाचा जोर कमी होत असला तरी सध्या तो विदर्भातून कोकणाकडे सरकत आहे. काही भाग वगळता विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात सक्रिय वाऱ्यांचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्याने कोकण आणि घाटात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये, विखुरलेल्या भागात, विशेषतः घाटात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे काही भागात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तसेच हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे ठाणे, पालघर आणि मुंबईत अधूनमधून पावसासह ढगाळ वातावरण राहील. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
यावेळी, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्री वाऱ्यांमुळे देशभरात पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे. परिणामी, आंध्र प्रदेश ते ओडिशापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून, केरळ, अंतर्गत कर्नाटक आणि किनारपट्टी तमिळनाडूसह दक्षिण भारतात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.