फक्त एक वर्षाच्या मुलाने गिळली व्हिक्सची डबी, डॅाक्टर पण झाले हैराण
Nashik: A child swallowed a box of Vicks, even the doctor was shocked

वेगवान मिडिया / मुक्ताराम बागुल
नांदगाव, ता. 6 सप्टेंबर 2024- एक वर्षाच्या चिमूरड्याने व्हिक्सची गिळल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडली आहे. लहान मुलगा असल्यामुळे व्हिक्सची डब्बी गिळाल्यामुळे डॅाक्टर पण हैराण झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जवळ असलेल्या पानेवाडी येथील सागर काकड यांच्या घरी ही घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात ही चर्चा होती की ही डबी 1वर्षाच्या मुलाने गिळली कशी.
नांदगाव तालुक्यातील मनमाड जवळ असलेल्या सागर काकड यांचे कुटुंब रात्री घरात जेवण करत असताना. त्यांचा एक वर्षाचा मुलगा मल्हार याने व्हिक्सची डबी गिळल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ती डबी काढण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु ती त्या बालकाच्या घशात आणखीन आत गेली. असल्याने काकड यांनी त्या लहान मुलाला मनमाडच्या देवकी … हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
काही वेळणाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर रवींद्र राजपूत, विजय राजपूत यांनी शर्तीचे प्रयत्न करून यशस्वीपणे घशात अडकलेली डबी बाहेर काढली.
या एक वर्षाच्या मुलाला जीवदान दिले. यावेळी काकड कुटुंबीयांनी सुटकेचा निस्वास टाकला. या सर्व धावपळीत आणि त्यांचे आई वडील फार घाबरलेली होते. मात्र डबी बाहेर निघाली असून बाळाची प्रकृती आता ठीक आहे.
