Nashik एकरामध्ये शेतक-यांने मक्याचे एवढं उत्पादन घेतलं की तुम्ही विश्वास ठेवणार नाही
Nashik एकरामध्ये शेतक-यांने मक्याचे एवढं उत्पादन घेतलं ती तुम्ही विश्वास ठेवणार नाही
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिक,ता. 5 सप्टेंबर 2024- Agriculture News नांदगांव तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी कैलास बाबुराव गायकवाड यांनी या खरीप हंगामात एका कंपनीचे 5108 वाणाची मका बियाणे खरीप पेरणी करून या हंगामात विक्रमी एकरी उत्तपन्न काढले. Farmers in Nashik Acres have yielded so much maize that you won’t believe
नांदगांव बाजार समितीत सर्वाधिक भाव देखील या शेतक-याने घेतला मिळाला .त्यांचा नांदगांव बाजार समितीकडुन जाहीर सत्कार करण्यात आला.
सदर कंपनीकडून नरेंद्र खैरनार यांनी गायकवाड यांचे शेतवर जाऊन विशेष अभिनंदन केले. कैलास गायकवाड यांना बियाने विक्रते विनायक गांगुर्डे व कंपनी प्रतिनिधी नरेंद्र खैरनार व राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाने 5108 हा मका पेरणी केली.
5108 मका खरीप वाण कमी दिवसात कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आहे. त्यामुळे लवकर तयार झाले व मार्केटला कमी कालावधीत. विक्रिस आल्यामुळे गायकवाड यांना 2351रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.
त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याची दखल मार्केट चे सचिव अमोल खैरनार यांनी घेऊन त्यांचा सत्कार केला. कैलास गायकवाड यांनी शेतकरी बांधवाना विनंती पूर्वक आवाहन केले कि जसे मी हायटेक बियाणे लावून उत्पादन घेतले तसेच तुम्ही पण हायटेक हे वाण पेरणी करून कमी दिवसात चांगले उत्पादन घ्या.असे आवाहन केले.
योग्य पिक नियोजन करून त्यांनी सुरवातीला 1 पाकीट बियाणे पेरणी केली होती ( अर्धा एकर ) त्यात त्यांना 23क्विंटल उत्पादन मिळाले.हे वाण कमी(100) दिवसात येणारे असून गायकवाड यांना त्याचे उत्पादन ९० दिवसात मिळाले .याचा अर्थ एकरी47 क्विंटल मकाचे उत्पादन घेतले.
वेळेत पेरणी करुन अंतर मशागत करणे तसेच वेळेत पुरेसा पाऊस झाल्याने शेतकरी मकाचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतो हे कैलास गायकवाड यांनी शक्य करुन दाखविले.