मोठ्या बातम्या

महाराष्टातून जाणा-या नवीन दुस-या रेल्वे मार्गात अनेकांची शेती जाणार

महाराष्टातून जाणा-या नवीन दुस-या रेल्वे मार्गात अनेकांची शेती जाणार


वेगवान नाशिक / मारुती जगधने 

नाशिक वेगवान :  बहुचर्चीत व अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेला रल्वेच्या  लोहमार्ग प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. या मार्गावर ३० रेल्वेस्टेशन होणार आहे हा लोहमार्ग पूर्ण व्हायला साहा ते सात वर्षे लागतील. महाराष्टातून जाणारा हा रेल्वे मार्ग आता नवीन अनेक शहरांची ओळखं निर्मीण करणार आहे. महाराष्ट्रातून दुस-या राज्यात जाणारा हा रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढविणार आहे. यात शंका नाही.

 

मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ हजार कोटीला मान्यता दिल्याने ११६ वर्षाची प्रतीक्षा संपली आहे.
केंद्रीय मंञी मंडळाने मनमाड इंदोर या लोहमार्गाला १८हजार कोटींचा नवा रेल्वे मार्ग व कृषी, पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास हा कमी तासांचा होणार असून ४ तासांचा वेळ वाचणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

मनमाड पासून मध्यप्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वे मार्ग बांधणीच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८ हजार ३६कोटी रुपये खर्च होणार आहे. माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली . हा प्रकल्प २०२८ ते २९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे .यामुळे मुंबईपासून इंदूरपर्यंतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे.
या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेशामधील महत्त्वाच्या भागातील दळणवळणाचे प्रमाण वाढणार आहे. वैष्णव यांनी म्हटले या प्रकल्पाला पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समितीने १८,०३६ कोटी रुपयांना खर्चाचा नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे .त्यामुळे अनेक वर्षापासून असलेली प्रतिक्षा संपली , या मार्गाला नवीन गावे ही जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे१०००गावे आणि३० हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच नवीन गावे ही या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी मनमाड नाशिक मुंबई गुजरात मार्गे जावे लागत असे. मुंबई गुजरात ,इंदोर ,ही,मनमाड व्यावसायिक दृष्टीने महत्वाची केंद्र आहे.

 

मध्यप्रदेश व महाराष्ट्र यादोन्ही राज्यातील मनमाड- इंदोर दरम्यान रेल्वे मार्गात सहा जिल्ह्यांना व दोन राज्यांना जोडणार आहेत.
★मालवाहतूक होणार सुलभ

 

मनमाड इंदोर

 

नवे रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने कंटेनर, खते ,लोह ,खनिज ,सिमेंट पेट्रोलियम तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे .सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल.
३० नवीन रेल्वे स्थानके मनमाड ते इंदूरदरम्यान रेल्वेमार्गावर उभारण्यात येतील.
१००० गावे व ३० लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल.

 

★फायदा काय?

१.महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील सहा जिल्हे जोडले जातील त्या भागात दळणवळण वाढणार.
२. मध्यप्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.
३.मनमाड इंदूर मधील नवीन रेल्वे मार्गामुळे पर्यटन वाढीलाई मदत श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन इंदूर,महाराष्ट्रातील जेजुरी ते चंदनपुरी याञा लवकर आणी सुलभ होईल तसेच परिसरातील पर्यटन स्थळांना फायदा होईल .

 

★इंदूर साठी सध्या लांबचा प्रवास

● मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी सध्या दोन पर्याय आहेत एक पर्याय म्हणजे मुंबई सेंट्रल येथून पश्चिम रेल्वेने रतलाम नागदा, उज्जैन व इंदूर असा ८२८ किलोमीटर लांबीचा मार्ग .

● दुसरा पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून भोपाळमार्ग इंदूर गाठणे. त्यासाठी भोपाळ येथे ट्रेन बदलावी लागेल हे एकूण अंतर १११०किलोमीटर आहे. ●नवा मार्ग जवळपास ६०० किलोमीटर एवढा आहे त्यामुळे किमान ४ तास वाचणार आहेत.
उद्योगांनाही लाभ

प्रीतमपुर ऑटो क्लस्टर हे या रेल्वे मार्गाद्वारे मुंबई जवळील जे एनपीए बंदर व अन्य राज्यातील बंदरांशी जोडले जाईल पिथंपुर ऑटो क्लस्टर मध्ये ९०मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत तसेच येवला कापड, पैठणी व मालेगांव कापड, लुगडी नववार साडी या व्यवसायाला चालना मिळेल.

★रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये*

•३०९ किमी लांबी* १८ हजार ३६कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
* सन २०२८ -२९ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा
* १०२ लाख मानवी दिवसांचा रोजगार होणार उपलब्ध
•एकूण ६ जिल्ह्यांमधून जाणार नवा मार्ग
* मालेगाव येणार रेल्वेच्या नकाशावर

११६ वर्षांच्या मागणीची पूर्तता

अविकसित भागाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मनमाड ते इंदूर हा महत्त्वकांक्षी आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प आहेत मनमाड येथून थेट इंदूरपर्यंत रेल्वे मार्ग विकसित झाला तर या भागाच्या विकास झाला त्यांना मिळेल या हेतूने नाशिक धुळे जळगाव नंदुरबार येथील लोकप्रतिनिधी फार पूर्वी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाची कल्पना केंद्र सरकारकडे मांडली त्यानंतर या मागणीसाठी सातत्याच्या पाठपुराव्यामुळे १९०८ मध्ये मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी पहिले सर्वेक्षण झाले त्यानंतर अनेक वेळा घोष नाही झाल्या पण प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे रीतसर भूमिपूजन झाली तरीही या मार्गासाठी फारशी तरतूद केली गेली नव्हती हा मार्ग कशाप्रकारे जाईल याचा पूर्ण आढावा घेण्यात आला या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातला कांदा आणि इतर शेती पिकांना मध्य प्रदेश सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे लोकसभेमध्ये या मार्गाची मागणी मालेगावचे तत्कालीन खासदार झेड एम कहांडोळे यांनी केली त्यानंतर हरिभाऊ महाले सिताराम भोई, कचरू भाऊ राऊत, हरिश्चंद्र चव्हाण या लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली.

३४० किमी लांबीच्या मनमाड इंदूर या मार्गात चे महत्व ब्रिटिशांनी त्या काळात देखील ओळखले होते १९१३ साली ब्रिटिशांनी सर्वप्रथम या रेल्वे मार्गाची संकल्पना मांडली होती त्यानंतर तो जवळपास ९० वर्ष बासनात गुंडाळलेला राहिला त्यानंतर नितेश कुमार रेल्वे मंत्री असताना २००३ ते ४ च्या दरम्यान हा रेल्वे मार्ग पुन्हा चर्चेत आला मात्र तत्कालीन सर्वेक्षणात अधिकाऱ्यांनी या मार्गाचे चक्क तोट्यात जाण्याची शक्यता असल्याचे नमूद करून पुन्हा फायलीत बंद केली लालूप्रसाद यादवांच्या काळात देखील याची चर्चा झाली पण केंद्रांची मंजुरी मिळत नव्हती २००९ साली ममता बॅनर्जी नियोजन आयोगाने तत्वतः काही अटी शर्तीवर त्याला मान्यता दिली २०१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाचे काम मंजुरीसाठी नियोजन आयोगाकडे पाठवण्यात आले ते मंजूर देखील झाले तथापि २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री पवन कुमार बंसल यांनी मंजुरी देऊन सुखद धक्का दिला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर खानदेशात या निर्णयाची जोरदार स्वागत होत आहे

★ कॅबिनेट बैठकीत मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गे ला केंद्र सरकारने मान्यता दिली ही आनंदाची बाब आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिनांक २७ जून रोजी भेट घेऊन , या रेल्वे मार्गासाठी केलेली विनंती मान्य केली आहे. त्याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले हे धुळे लोकसभा मतदार संघातील जनतेचे यश आहे.

– डॉ. शोभा बच्छाव ,खासदार ,धुळे.

★ मी धुळ्याचा खासदार म्हणून निवडून आल्यापासून या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करीत आलो आहे या कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य होते या मार्गाचा डीपीआर व एमओयु मंजूर झाला होता धुळे ते नरडाणे या मार्गे साठीचे टेंडर निघाले असून जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे.

– डॉ .सुभाष भामरे ,माजी खासदार, धुळे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!