नाशिक ग्रामीण

नाशिकः अखेर अनेक वर्षापासून या शहराचे पाणी संकट संपल !

अखेर अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील या शहराची पाणी संकट संपल Nashik: Finally, the water crisis of this city will end for many years!


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नांदगाव, ता. 4 सप्टेंबर 2024- नांदगांव तालुक्यातील मनमाड गावाचा प्रलंबित पाणी प्रश्न मागणीनुसार ४० वर्षांनी मार्गी लागला. या साठी अनेक हातांनी कष्ट घेतले. आनेक वर्षापासून तहानलेल्या मनमाड वासीयांना करंजवण पाणीपुरवठा योजनेचे पाणी मनमाड फिल्टर हाऊसला येऊन पोहचले आहे.Nashik: Finally, the water crisis of this city will end for many years!

हि मनमाड करांसाठी अतिशय आनंदाची आणी इच्छापूर्ती करणारी पाणीयोजना जवळपास पुर्णत्वास आली आहे. कोट्यावधी रूपये खर्चकरुन हे पाणी करंजवन धरणातुन जलवाहीनीच्या मदतीने मनमाड शहराच्या फिल्टर जलकुंभात उकळ्याघेत बाहेर निघाले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

आता मनमाड करांना शुध्द पाणी पिण्यासाठी नवांजीवनी आरोग्यदायी ठरलेले शुध्द पाण्यावर मनमाड करांनी प्रेंम करावे तितके थोडेच आहे .ज्यांना फिल्टर वापरने शक्य नाही अशा गोर गरीब दिन दुबळ्यांना शुध्द गोड पाणी तहान भागविनार आहे.

या साठी आमदार सुहास कांदे हे करंजवन योजनेला दाता ठरले त्यांच्या अथक प्रयत्नाने मनमाडकरांची तृष्णा भाविली या योजनेचे पाणी मनमाड येथील फिल्टरमध्ये येताचा सर्वञ आनंदाचे व जल्लोशाचे वातवरण निर्माण झाले.

चाहत्यांनी नारळ फोडुन नव्यापाण्याचे पुजन केले व तो व्हिडीओ व्हायरल केला. सध्या मनमाडचे पाणी हा व्हिडीओ सर्वञ चर्चेचा विषय झाला आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!