नाशिक ग्रामीणशेती

मोठी बातमी -या लोकांच्या वाहनांना आता टोल मध्ये माफी

मोठी बातमी -या लोकांच्या वाहनांना आता टोल माफी


वेगवान मिडीया

देवळाली कॅम्प, ता. 5 सप्टेंबर 2024- नाशिक असो पुणे, अथवा नागपूर, अथवा मुंबई मुख्य रस्त्यांवर मोठं मोठे टोल वाहन धाराकांचा घाम कढतात. यामध्ये स्थानिक लोकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. दोन किलोमीटर जर टोल पास करायचा असेल तरी त्यांना संपूर्ण टोल भरावा लागतो. मात्र आता ही बातमी तुम्हाच्यासाठी आशेचा किरण घेऊन आली आहे. स्थानिक टोल  परिसरातील अनेक तालुक्यांना आता टोल माफी म्हणजे टोल मध्ये सवलत देण्याचा निर्णय टोल प्रशासनाने घेतलायं. Big news – now toll waived for these people’s vehicles

 

हे संपूर्ण बातमी समजून घेण्यासाठी आपल्याला ही संपूर्ण बातमी वाचवी लागणार आहे. जेणे करुन तुमच्या स्थानिक भागामद्ये तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

आतापर्यंत या भागातील वाहनधारकांना फक्त १० ते २० किमी अंतर कापूनही संपूर्ण ११८ किमीचा म्हणजेच १६५ रुपये टोल भरावा लागत होता. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. खासदार भगरे यांनी या समस्येची दखल घेत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि चांदवड टोल प्रशासनाशी संपर्क साधला.

 

पिंपळगाव टोलनाक्यावर नाशिक जिल्ह्यातील सर्व वाहनांना ज्याप्रमाणे सवलत मिळते, तसेच मालेगाव, सटाणा आणि कळवण तालुक्यातील वाहनधारकांनाही सवलत मिळत असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानुसार, निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील पात्र वाहनधारकांनाही सवलत देण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या.

 

खासदारांच्या या प्रयत्नांना यश आले असून, चांदवड टोलनाक्यावर आता निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील सर्व पात्र वाहनधारकांना सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी पात्र वाहनधारकांनी आधारकार्ड, फास्टॅग क्रमांक, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि मोबाईल नंबरसह संबंधित कागदपत्रे टोल प्रशासनाकडे सादर करावीत. त्यामळे आता टोल मध्ये माफी करण्यात येऊन संपूर्ण टोल भरण्या ऐवजी अगदी थोडफार पैसे भरावे लागणार आहे.

 

लाल दिवा निफाड:* निफाड तालुक्यातील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. चांदवड टोलनाक्यावर स्थानिकांसाठी सवलतीची मागणी खासदार श्री. भास्कर भगरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाली आहे. यामुळे निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

काही अडचणी आल्यास टोल नाक्यावरील व्यवस्थापकीय अधिकारी रवी अहिरे (९४०५५५५९२२) (९४२२२ ६२९९४), प्रकल्प संचालक (८१३०० ०६२०५) किंवा सुरेशबाबू (९५०३१ ०४७४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार भगरे यांनी केले आहे.

 

* नाशिककरांनाही मिळणार स्थानिक टोलमध्ये सवलत ? खासदारा पाठपुरावा करा, अशी नागरिकांची मागणी!

*नाशिक:* चांदवड टोलनाक्यावर निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील वाहनांना स्थानिक सवलत मिळाल्यानंतर आता नाशिककरांकडूनही अशीच मागणी जोर धरू लागली आहे. मालेगाव येथील वाहनांना पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्थानिक शुल्क आकारले जाते, तर नाशिकच्या वाहनांना चांदवड येथे १६५ रुपये मोजावे लागतात, यामुळे नाशिककरांमध्ये नाराजी आहे.

 

नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा मालेगाव तालुक्याला स्थानिक टोलमध्ये सवलत मिळू शकते, तर मग नाशिक शहरातील वाहनांना अशी सवलत का नाही? खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रश्नी लक्ष घालून नाशिककरांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

सोशल मीडियावर देखील #नाशिकला_सवलत_हवी हा हॅशटॅग वापरून नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिककरांचा हा रोष योग्य असून, खासदारांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते सिडको

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!