वसाका विक्री बाबत निघालेली निविदा रद्द करून वसाका विक्री न करता तो भाडे तत्वावर देण्यात यावा यासाठी दि. २४ जुलै रोजी वसाका कार्यस्थळावर वसाका बचाव समितीने लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी वसाका संलग्न सर्व घटकांनी वसाका विक्री न होता तो भाडे कराराने देण्यात यावा अशी भूमिका मांडली होती.
या बैठकीत आ. डॉ. आहेर यांनी बोलतांना सांगितले होते की, वसाकाशी माझी भावनिक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे तो विक्री होऊ नये ही माझी सर्वप्रथम भूमिका असून यासाठी सर्वांना सोबत घेऊन योग्य ती पावलं उचलली जातील. व वसाका भाडे कारारानेच दिला जाईल असा असा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने पाठपुरावा करून विक्रीस स्थगिती आणली त्यामुळे वसाकावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांनी आ.डॉ. आहेर यांचे आभार मानले.
यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आ. डॉ. राहुल आहेर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनासकर, अप्पर मुख्य सचिव वित्त ओ. पी गुप्ता, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था आर. एफ. निकम यांच्यासह पंडित निकम, विलास देवरे, अरुण सोनवणे, सुनील देवरे, हिरामण बिरारी, विलास सोनवणे, नंदू जाधव, रवींद्र सावकार, नाना देवरे, मुरलीधर धामणे, सतीश शिरुडे आदींसह वित्त व सहकार विभागाचे तसेच राज्य सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
https://wegwannashik.com/2024/09/05/the-government-has-decided-to-stop-the-money-of-this-beloved-sister-scheme/