मोठ्या बातम्या

महाराष्ट्रातील या नगराला आता मनोज जरांगेचे नाव, पहा कुठलं आहे ते गाव

महाराष्ट्रातील या नगरला आता मनोज जरांगेचे नाव, पहा कुठलं आहे ते गाव This city in Maharashtra is now named after Manoj Jarange, see where is that village


वेगवान मिडीया / मारुती जगधने

नांदगाव, ता. नाशिक, ता. 4 सप्टेंबर 23024-  कळमदरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव येथील कॉलनीला देण्यात आले हि महाराष्ट्रातील पहिली घटना आहे. एखांद्या सर्व सामन्याचा व मराठ्यांचा लढवया नेता चं नाव कॅालनीला देण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनलाय. This city in Maharashtra is now named after Manoj Jarange, see where is that village

मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करत आहे. जरांगे यांचे चित्रपट व तसेच शाळेला दिल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील मात्र एखांद्या गावातील कॅलनीला ( नगराला  ) आता मनोज जरांगे यांचे नावं देण्यात आले आहे.

या फलकाच्या उद्घाटन प्रसंगी दि ३ सप्टेंबर रोजी उद्घाटक म्हणून मराठा क्रांती मोर्चा राज्य उपोषणकर्ते नानासाहेब बच्छाव, छावा क्रांतिवीर सेना नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे ,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, मराठा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ निकम, वैभव दळवी, राहुल काकळीज ,हर्षल देसले, कळमदरी गावचे सरपंच डॉ. विशाल पगार, अखिल भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत पवार, किरण गवळे ,वैभव कुमावत, कृष्णा शेवाळे, महेश इमानदार, माजी उपसरपंच देविदास कौतिक पगार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या कार्यक्रमाचे आयोजन शेखर पगार लोकशाही धडक मोर्चा संस्थापक अध्यक्ष यांनी केले होते यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचा पहिला फलक कळधरी ता.नांदगांव येथे नामकरण करण्यात आले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!