नाशिक ग्रामीण

शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा*

शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा*


 

 

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

येवला,दि.४ सप्टेंबर :- येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तसेच दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिणीस दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते श्री अंबादास अण्णा बनकर, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राधाकीसन आप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते श्री अरुण मामा थोरात, विधानसभा अध्यक्ष श्री वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष श्री साहेबराव मढवई,शहराध्यक्ष श्री दिपक लोणारी, महिला शहराध्यक्ष श्री राजश्री ताई पहिलवान, विमलबाई शहा, जलचींतन जिल्हाअध्यक्ष श्री मोहन शेलार, मच्छिंद्र थोरात,देविदास शेळके,गणपत कांदळकर,सुनील पैठणकर,सुनील काबरा,दत्ता निकम,साहेबराव आहेर,विनायक भोरकडे,शाम बावचे,अल्केष कासलीवाल,पुंडलिकराव होंडे,अण्णासाहेब दौंडे,रावसाहेब आहेर,अशोक मेंगाने, नवनाथ बागल, दत्तू वाघ, भगवान ठोंबरे, दिपक गायकवाड,गोटू मांजरे, अमजद मेंबर, मलिक मेंबर, नवाझ मुलतानी, मुस्ताक मेंबर, युनूस मेंबर, बबलू शेख,समाधान पगारे,सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, वाल्मीक कुमावत, दिपक पवार,सचिन सोनवणे,संपत शिंदे, प्रवीण पहिलवान,अमोल येवले,विशाल परदेशी,विजय जेजुरकर,सौरभ जगताप,नवनाथ थोरात,नवनाथ पोळ,आकाश भालेराव,पार्थ कासार,राकेश कुंभारे,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन होणार आहे. या ठिकाणाहून पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर विंचूर, हनुमान नगर, भरवस फाटा, देशमाने, जळगाव नेऊर, एरंडगाव, अंगणगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर माउली लॉन्स ते शिवसृष्टी येथे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन प्रदेश सरचिणीस दिलीप खैरे यांनी केले आहे.

दरम्यान या बैठकीत सोमवार दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी विंचूर येथे येवला ते पिंपळस चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण,चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता रामा क्र ७ किमी १८९/४०० ते १९९/००० आणि
म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे रस्ता काँक्रीटीकरण करणे कामाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाबाबत देखील चर्चा करण्यात आली.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!