वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 4 सप्टेंबर 2024, बुधवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-मूळ वेतन साडेसहा हजाराची पगार वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर घेतल्याने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला. मूळ पगारामध्ये साडेसहा हजाराची वाढ करण्याचे आश्वासन देत केंद्र सरकारने आमची विनंती मान्य केले आहे. संघटनेसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात येत आहे असे संघटनेच्या वतीने कळविले आहे.राज्यातील कर्मचाऱ्यांनी उद्या दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवारपासून आपापल्या कामावर रुजू व्हावे असे संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी इतकी वेतन श्रेणी एसटी कर्मचाऱ्यांना द्यावी ही मागणी सरकारसाठी महत्त्वाची बाब होती. राज्यातील विधानसभा निवडणुका पुढच्या काही दिवसावर ठेपले असून गणेशोत्सव पुढच्या काही दिवसात आला. आपण निर्णयानंतर मुख्यमंत्री व परिवहन खात्याचे एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सगळ्यात मोठी पगारवाढ दिली आहे असे म्हटले तर व्हावी ठरणार नाही.
यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्या संघटनांच्या समाधान झालेले दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असून साडेसहा हजार रुपये पगार वाढ सरकारने केली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून एसटी बसेस सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांचा संघटना पदाधिकाऱ्यांत यशस्वी चर्चा होऊन आज निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल दूर होणार आहेत.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.